PMC STP Water Tanker App | 4 लाख 90 हजार लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा बांधकामासाठी वापर

HomeBreaking Newsपुणे

PMC STP Water Tanker App | 4 लाख 90 हजार लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा बांधकामासाठी वापर

Ganesh Kumar Mule Jul 05, 2023 3:31 PM

Katraj Zoo Online Ticket | राजीव गांधी प्राणिसंग्रहालय | 10 दिवसांत 10 हजार लोकांनी ऑनलाईन तिकीट सेवेचा घेतला लाभ | महापालिकेला 3 लाखांहून अधिक उत्पन्न
7th Pay Commission | सेवानिवृत्त सेवकांना फरकाची रक्कम अजूनही मिळेना  | 30 नोव्हेंबर पर्यंत रक्कम अदा करण्याचे मनपा प्रशासनाचे आदेश 
Merged Villages | समाविष्ट 23 गावातील 408 कर्मचाऱ्यांचे महापालिकेत समावेशन | महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी जारी केले आदेश

PMC STP Water Tanker App | 4 लाख 90 हजार लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा बांधकामासाठी वापर

| पुणे शहरातील बांधकामासाठी STP मधून प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकारक 

 
PMC STP Water Tanker App | शहरातील सांडपाण्याचा पुनर्वापर (Storm Water Reuse) करण्याच्या उद्देशाने पुणे महानगरपालिकेमार्फत (Pune Municipal Corporation) बांधकामासाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याचा वापर टाळून व बांधकामासाठी सांडपाण्यावर पुनर्प्रकीया केलेल्या पाण्याचा वापर होणेसाठी STP टँकर नावाचे अॅप विकसित केले आहे. अॅप विकसित केल्यासून सदर अॅपला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत एकूण १४७ टँकरधारक व ७६५ बिल्डर्सनी नोंदणी (Builder’s Registration) केली असून या अॅपमार्फत एकूण ७६५ बिल्डर्सला १४७ टँकर ८ सांडपाणी प्रकल्पाच्या माध्यमातून ४ लाख ९० हजार लिटर इतक्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून या पाण्याचा बांधकामासाठी वापर केला आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (PMC STP Water Tanker App)
 
 पुणे शहरात (Pune city) चालणाऱ्या विविध बांधकामांसाठी (Construction) यापुढे पिण्याचे पाणी तसेच बोअरवेल, विहिरींचे पाणी न वापरता फक्त STP मधून प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या विकसकांमार्फत (Builder) सदरचे पाणी वापरले जाणार नाही, त्यांचेवर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) विविध खात्यामध्ये (PMC Departments) चालू असलेल्या कॉक्रिटीकरणाचे कामाकरीता देखील संबंधित ठेकेदारांनी (contractor) STP मधून प्रक्रिया केलेले पाणी वापरणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून (PMC water supply department) हा निर्णय घेण्यात आला आहे. (PMC Pune water supply department) 

विकसकांकडून (Builder) पुणे शहरात (Pune city) विविध ठिकाणी चालणाऱ्या बांधकामांमध्ये पुणे महानगरपालिकेचे (PMC Pune) सिवेज ट्रिटमेंन्ट प्लॅन्टस् (Sewage Treatment plant) मधून प्रक्रिया केलेले पाणी वापरणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) बंधनकारक केलेले आहे. या विकसकांना STP मधून प्रक्रिया केलेले पाणी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने पुणे महानगरपालिकेने pmcstpwatertanker हे Appविकसित केले असून, , हे सध्या Android Phone साठी विकसित करण्यात आलेले आहे. सदर Appमध्ये विकसकांनी त्यांचे बांधकामाचे साईटनिहाय रजिस्ट्रेशन करावयाचे आहे. STP चे प्रक्रिया केलेले पाणी पुरविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या टँकरमालकांनी सदर App वर रजिस्ट्रेशन केलेले असून, ज्या साईटवर विकसकांना STP मधून प्रक्रिया केलेले पाणी आवश्यक आहे त्यानुसार सदर App चे माध्यमातून त्यांनी त्यांची मागणी नोंदवावयाची असून, उपलब्ध टँकर मालकांचे यादी मधील टँकरधारक नोंदवायचे असून, App मध्ये नमूद केलेले शुल्क सदर टँकरधारकाला टँकर साईटवर पोहचविण्याचे अनुषंगाने अदा करावयाचे आहे.

—-
News Title | PMC STP Water Tanker App | Treatment of 4 lakh 90 thousand liters of waste water and use of water for construction