PMC Statue Structural Audit | पुणे महापालिका आपल्या अखत्यारित येणाऱ्या सर्व पुतळ्यांचे करणार स्ट्रक्चरल ऑडिट!   | महापालिका भवन रचना विभागाची माहिती

File Photo

Homeadministrative

PMC Statue Structural Audit | पुणे महापालिका आपल्या अखत्यारित येणाऱ्या सर्व पुतळ्यांचे करणार स्ट्रक्चरल ऑडिट! | महापालिका भवन रचना विभागाची माहिती

Ganesh Kumar Mule Aug 29, 2024 9:11 PM

Shivgarjana Mahanatya  | शिवगर्जना महानाट्याला पहिल्याच दिवशी पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद |  महानाट्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दोन तास उपस्थिती
Shivshrishti | राज्यात सहा ठिकाणी शिवसृष्टी उभारल्या जाणार
Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडित ऐतिहासिक वस्तूंचे संकलन करणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

PMC Statue Structural Audit | पुणे महापालिका आपल्या अखत्यारित येणाऱ्या सर्व पुतळ्यांचे करणार स्ट्रक्चरल ऑडिट!

| महापालिका भवन रचना विभागाची माहिती

 

PMC Bhavan Rachna Department – (The Karbhari News Service) – राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) झालेल्या घटनेचे गांभीर्य पाहत पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation – PMC). एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महापालिका आपल्या अखत्यारित येणाऱ्या सर्व पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट (Structural Audit) करणार आहे. यातून पुतळे किती सुरक्षित आहेत, हे कळणार आहे. अशी माहिती भवन विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख (Chief Engineer Yuvraj Deshmukh) यांनी दिली. (Pune Statue)

मालवणमधील राजकोट किल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केवळ आठ महिन्यामध्येच अचानक दुर्घटनाग्रस्त झाला आहे. हा पुतळा उभारताना अनेक अक्षम्य त्रुटी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यामुळे राज्य आणि देशभरात याचे पदसाद उमटले आहेत. (Pune PMC News)

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे महापालिकेने देखील एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महापालिका आपल्या अखत्यारित येणाऱ्या सर्व पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार आहे. याबाबत मुख्य अभियंता युवराज देशमुख यांनी सांगितले की, शहरातील पुतळ्याबाबत आम्ही नगरसचिव विभागाकडून माहिती घेतली आहे. त्यानुसार महापालिका हद्दीत महापालिकेकडून अर्धाकृती आणि पूर्णकृती असे जवळपास ५० हून अधिक पुतळे उभारण्यात आले आहेत. त्या पुतळ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे या सर्व पुतळ्यांचे ऑडिट करण्यात येईल. जिथे सुधारणा करणे गरजेचे आहे, तिथे सुधारणा आणि डागडुजी केली जाईल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0