PMC Solid Waste Management Department | महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार आता रात्रपाळीत झाडणकाम! | आवश्यक २१३ वाहने आणि १४७२ सफाई सेवक तैनात
| घनकचरा विभागाकडून शहराच्या सार्वजनिक स्वच्छतेच्या अनुषंगाने रात्रपाळीमधील कामकाजाचे नियोजन
Sandip Kadam PMC – (The Karbhari News Service) – जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांनी ०५ जुलै रोजी शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणांची पाहणी केली व सदर पाहणीचे अनुषंगाने शहरातील सार्वजनिक स्वच्छतेचे कामकाज व झाडणकाम रात्री १०.०० वा ते सकाळी ०६.०० वा या वेळेत करण्याचे आदेशित केले आहे. त्या अनुषंगाने उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन यांनी परिमंडळ क्र. १ ते ५ कडील मा. उपायुक्त व सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडील महापालिका सहाय्यक आयुक्त, मुख्य आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक यांची बैठक आयोजित केली होती. तसेच रात्रपाळीतील झाडणकामाच्या नियोजनाबाबत आढावा बैठक देखील आयोजित करण्यात आली होती. बैठकीत आदेशित केले प्रमाणे सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडून रात्रपाळीतील झाडणकाम करणेकरीता आवश्यक २१३ वाहनांची संख्या व १४७२ सफाई सेवकांची संख्या क्षेत्रीय कार्यालय निहाय करण्यात आलेली आहे. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम यांनी दिली. (Pune Municipal Corporation – PMC)
त्याअनुषंगाने तसेच मोटार वाहन विभागामार्फत व घनकचरा व्यवस्थापन मुख्य विभागाकडील यांत्रिकी वर्गामार्फत क्षेत्रीय कार्यालयांना आवश्यक असलेल्या वाहनांची उपलब्धी व कचरा हस्तांतरण केंद्रावरील रात्रपाळीचे कामकाजाचे नियोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी ०७ पासून रात्रपाळीतील झाडणकामासाठी आवश्यक सेवकांची नियुक्ती करून मा. महापालिका आयुक्त यांचे आदेशानुसार रात्री १०.०० वा ते सकाळी ०६.०० वा या वेळेत मुख्य रस्ते, पब्लिक प्लेसेस, गर्दीचे ठिकाणे व VIP रस्त्यांचे झाडणकामाचे स्वच्छतेचे कामकाज सुरु करण्यात आले आहे.
तरी, सर्व क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मुख्य रस्ते झाडण काम करणे, क्रोनिक स्पोट, फिडर स्वच्छता करून कचरा उचलून घेणे हि स्वच्छता विषयी कामे मा. महापालिका आयुक्त यांचे आदेशानुसार सुरु करण्यात आले आहे. सदर कामकाजा दरम्यान एकूण काल ०८ रोजी अंदाजे १३६ मे. टन कचरा संकलित करण्यात आलेला आहे. सदर रात्रपाळी चे कामकाज पुणेकर नागरिक सकाळी मोर्निंग वॉक साठी किवा कामासाठी घराबाहेर पडतील त्यावेळेस शहर स्वच्छ राहणेबाबत तसेच पुणे शहर स्वच्छ राखण्याकरीता घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. याकरिता पुणेकर नागरिक यांचा सक्रीय सहभाग घेऊन पुणे शहर स्वच्छ, सुंदर राखण्याकरीता सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
COMMENTS