PMC Social Welfare Department | पुणे महानगरपालिका दिवाळी बचत बाजार प्रदर्शन व विक्री उपक्रम 3 नोव्हेंबर पासून
PMC Social Welfare Department | पुणे महापालिका समाज विकास विभाग पुरस्कृत शेजार समूह गट व बचत गटांतील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचे ‘दिवाळी बचत बाजार प्रदर्शन व विक्री उपक्रम’ 3 नोव्हेंबर पासून सुरु होत आहे. हे प्रदर्शन 8 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. शहरातील 5 ठिकाणी हे प्रदर्शन भरवले जाणार आहे. अशी माहिती समाज विकास विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation)
प्रदर्शनात कशाची खरेदी कराल?
दिवाळी फराळ व साहित्य : चकली, लाडू, करंजी, शंकरपाळी, अनारसे, शेव, चिवडा, पणत्या, रांगोळी, दीपमाळा, आकाशकंदिल
इतर खाद्यपदार्थ : वांग्याचे भरीत, पिठलं-भाकरी, मांडे, सॉस, शीतपेये, सोलकढी, लोणची, पापड, विविध मसाले, तयार पिठे, शेवया, कुराड्या, या व्यतिरिक्त बिर्याणी व इतर शाकाहारी व मांसाहारी खाद्य पदार्थांचे विविध प्रकार, तसेच घरगुती वापरातील विविध वस्तू-लाकडी खेळणी, स्वेटर्स, तयार कपडे, फिनाईल, तोरण, लोखंडी तवे, आयुर्वेदिक उत्पादने, लेदर-कापडी पिशव्या, कापडी फाईल, फोल्डर, पेपर प्रॉडक्टस्, ज्वेलरी व सौंदर्य प्रसाधने, अगरबत्ती इ. विविध प्रकारचे स्टॉल्स्,
:::: प्रदर्शन दिनांक, स्थळ व वेळ ::::
दि. ३ नोव्हेंबर २०२३ ते दि. ८ नोव्हेंबर २०२३
सकाळी ११-०० ते रात्रौ ९-००
दि. ३ नोव्हेंबर २०२३ ते दि. ८ नोव्हेंबर २०२३
सकाळी ११-०० ते रात्रौ ९-००
– कुठे असणार प्रदर्शन?
1. पु.ल. देशपांडे उद्यान, सिंहगड रोड, पुणे ३०.
2. स.नं.२५३/८-६८५/५९ टेलिफोन एक्सचेंजसमोर, कुमार प्रॉपर्टीज् लगत, बाणेर डी पी रोड, पुणे ४५.
3. नविन भाजी मंडई, पुण्यनगरी शेजारी, स्टेलामेरी शाळेसमोर, वडगांवशेरी, पुणे.
4. कै. नथुजी मेंगडे जलतरण तलाव, कमिन्स कॉलेजजवळ, गल्ली क्र. १, शाहु कॉलनी कर्वेनगर, पुणे ५२.
5. कात्रज दुध डेअरी, एक्सपो मैदान, कात्रज, पुणे.
—-