PMC Sky Sign Department | जाहिरात फलक साठी 2023 ते 26 साठी 580 तर 2026 ते 29 सालापर्यंत 700 रु दर | स्थायी समितीची मान्यता | मुख्य सभा मात्र नगरसेवक आल्यानंतरच निर्णय घेण्याची शक्यता!

Homeadministrative

PMC Sky Sign Department | जाहिरात फलक साठी 2023 ते 26 साठी 580 तर 2026 ते 29 सालापर्यंत 700 रु दर | स्थायी समितीची मान्यता | मुख्य सभा मात्र नगरसेवक आल्यानंतरच निर्णय घेण्याची शक्यता!

Ganesh Kumar Mule Dec 23, 2025 3:04 PM

Solapur Road Traffic | सोलापूर रस्ता घेणार मोकळा श्वास | वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी मनपा प्रशासन प्रयत्नशील
Safai Karmchari | सफाईची कामे करणाऱ्या सर्व कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू | हजारो सफाई कामगारांच्या कुटुंबांना मिळाली नोकरीची शाश्वती
Creative Foundation |Chandrakant Patil |   क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे  चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते दिव्यांग मुलांना मदतीचा हात 

PMC Sky Sign Department | जाहिरात फलक साठी 2023 ते 26 साठी 580 तर 2026 ते 29 सालापर्यंत 700 रु दर | स्थायी समितीची मान्यता | मुख्य सभा मात्र नगरसेवक आल्यानंतरच निर्णय घेण्याची शक्यता!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेने शहरातील जाहिरात फलकाचे परवाना शुल्क सुधारित करण्याचा निर्णय घेतला आहे. जाहिरात फलक नियमन व नियंत्रण नियमानुसार नवीन दर ठरवण्यात आले आहेत. आता हे दर २२२ रुपये प्रति चौरस फुटावरून ५८० ते ७०० इतका असणार आहे. जाहिरात फलकासाठी वर्ष २०२३ ते २०२६ साठी ५८० रु इतका दर असणार आहे. तर २०२६ ते २०२९ सालासाठी ७०० रु असा दर असणार आहे. या बाबतच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने मान्यता दिली आहे. मात्र आचारसंहिता लागू झाल्याने या धोरणाला मुख्य सभेची मान्यता मिळू शकलेली नाही. नगरसेवक आल्यानंतर मुख्य सभेत याचा निर्णय होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

होर्डिंग असोसिअशन ने उच्च न्यायालयात पुणे महानगरपालिकेविरुद्ध सन २०१८ पासून आकाशचिन्हे व जाहिरात यांवरील शुल्क आकारणी व दरवाढ याबाबत याचिका दाखल केली होती. महापालिकेने आकारणी केलेला २२२ प्रती चौरस फुट दर संघटनेला मान्य नव्हता. त्यामुळे व्यावसायिक यांनी तेवढे शुल्क भरत नव्हते. मात्र आता कोर्टाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे आता व्यावसायिकांना २२२ ने शुल्क भरावे लागणार आहे.

दरम्यान त्यानंतर महापालिका आकाशचिन्ह आणि परवाना विभागाने होर्डिंग धारकांना अजून एक दणका दिला आहे. जाहिरात फलकाचे दर सुधारित करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. त्यानुसार याबाबतचे धोरण स्थायी समितीने मान्य केले आहे.

स्थायी समितीने मान्य केलेल्या प्रस्तावानुसार पुणे महापालिका ही A दर्जाची महापालिका असून BMC नंतर राज्यातील दुसरी मनपा आहे. पुणे महापालिकेचा प्रशासकीयदृष्ट्या खर्च हा ३६०० कोटींच्या वर गेला आहे. तरीही जाहिरात शुल्क मात्र BMC च्या तुलनेत १/३ इतके आहे. तसेच आकाशचिन्ह विभाग कारवाई करणे आणि मनुष्यबळ यासाठी वर्षाला 38 कोटी इतका खर्च करतो.

या सर्व गोष्टीमुळे दर निश्चित करण्यात आले आहेत. असे  प्रस्तावात म्हटले आहे.

हे आहेत मुख्य निर्णय

1. 2013 ते 2022 या कालावधीत होर्डिंग धारकानी 111 रू प्रमाणे शुल्क भरले आहे. मात्र न्यायालयाच्या निर्णयांनुसार हे शुल्क 222 रू प्रमाणे वसूल केले जाईल. तसेच त्याला 2% प्रति महा प्रमाणे व्याज आकारले जाणार आहे.

2. 1 एप्रिल 2023 पासून प्रति वर्ष 10% वाढीनुसार 2023 ते 2026 या कालावधीसाठी जाहिरात फलक दर हे प्रति चौरस फूट 580 रू इतका असेल.

3. 1 एप्रिल 2026 पासून प्रति वर्ष 10% वाढीनुसार पुढील तीन वर्षासाठी म्हणजे 2026 ते 2029 या कालावधीसाठी जाहिरात फलक दर हे प्रति चौरस फूट 700 रु इतका असेल.

दरम्यान या प्रस्तावाला स्थायी समितीत मान्यता मिळालेली असली तरी अजून मुख्य सभेत याला मंजुरी मिळालेली नाही. धोरण ठरवण्याचा अधिकार हा मुख्य सभेला असतो. हे धोरण नवीन नगरसेवक ठरवतील. अशी शक्यता आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: