PMC Shahari Garib Yojana | शहरी गरीब योजनेच्या कार्ड साठी नागरिकांना करावे लागणारे हेलपाटे झाले कमी!
| ऑनलाईन सुविधा केल्याने नागरिकांना होतोय फायदा
PMC Health Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना (Urban Poor Medical Assistant Scheme) चालवली जाते. योजनेच्या कार्ड साठी नागरिकांना पूर्वी महापालिकेत बरेच हेलपाटे मारावे लागत. मात्र नागरिकांचा हा त्रास आरोग्य विभागाने कमी केला आहे. संबंधित रुग्ण आता पॅनलवरील हॉस्पिटल मध्ये जाऊन तिथे एडमिट होऊन देखील हमीपत्र (Pre Authorisation Letter) घेऊ शकतात. तशी सुविधा महापालिकेने केली आहे. संबंधित हॉस्पिटल ऑनलाइन माध्यमातून महापालिकेकडे रुग्णाचा अर्ज आणि कागदपत्रे पाठवतात. त्यानंतर आरोग्य विभाग तसे पत्र जारी करते. यात रुग्णाचा वेळ आणि पैसा देखील वाचला आहे. १ एप्रिल पासून ही सुविधा करण्यात आली आहे. अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ संजीव वावरे (Dr Sanjeev Wavre PMC) यांनी दिली. (Pune Municipal Corporation Health Department)
पुणे महापालिकेची शहरी गरीब योजना काय आहे? (What is PMC Punes Urban poor medical support scheme)महापालिकेने 2008-09 पासून ही योजनासुरू केली आहे. शहरातील नागरिकांना आरोग्य सेवा देणे महापालिकेचे प्राथमिक कर्तव्य असले तरी, महापालिकेकडून केवळ वैद्यकीय केंद्र चालविले जातात. तर काही ठराविक दवाखाने वग़ळता महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये शस्त्रक्रिया, उपचार, तपासण्या होत नाहीत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांना खासगी दवाखान्यांमद्ये भरमसाठ पैसे मोजून उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे नागरिकांसाठी पालिकेने 2008-09 पासून ही वैद्यकीय सेवा योजना सुरू केली आहे. त्यात, प्रमुख निकष संबधित कुटूंब महापालिका हद्दीतील असावे तसेच त्यांचे उत्पन्न 1 लाखांच्या आत असावे हे होते. तर या योजनेसाठी महापालिकेने शहरातील खासगी रूग्णालयांचे पॅनेल तयार केले असून या रूग्णालयात या योजनेत 1 लाखांपर्यंतचे तर इतर काही आजारांसाठी 2 लाखांपर्यंत उपचार दिले जातात. मात्र, 1 लाखांच्यावर 1 रूपया अधिक उत्पन्न असले तरी अनेकांना आर्थिक दुर्बल असूनही उपचार मिळत नाहीत. त्यामुळे, पालिकेने आता उत्पन्न मर्यादा 1 लाख 60 हजार रूपये करण्याचा निर्णय घेतला आहे. (Pune Municipal Corporation)
शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना (Urban Poor Medical Assistant Scheme) ही योजना आता पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे. यामुळे यातील नागरिकांची आणि नागरिकांकडून होणारी फसवणूक देखील थांबली आहे. दरम्यान या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी कार्ड घेणे बंधनकारक आहे. मात्र हे कार्ड मिळवण्यासाठी नागरिकांना महापालिकेत वारंवार चकरा मारण्याची गरज पडायची. मात्र आरोग्य विभागाने आणि सहायक आरोग्य अधिकारी डॉ संजीव वावरे यांच्या संकल्पने अंतर्गत कार्ड प्रक्रिया ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या माध्यमातून महापालिकेच्या पॅनलवर असणाऱ्या हॉस्पिटल ना याचे एक्सेस देण्यात आले आहेत. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र लॉग इन आयडी देण्यात आले आहेत. यानुसार आता नागरिक सरळ हॉस्पिटल मध्ये भरून हमीपत्र साठी अर्ज करू शकतात. अर्ज आणि कागदपत्रे हॉस्पिटल कडून ऑनलाइन पद्धतीने महापालिकेकडे पाठविण्यात येतात. त्यानुसार आरोग्य विभाग हमीपत्र मंजूर करते. यात नागरिकाचा वेळ आणि पैसा देखील वाचत आहेत.
—-
शहरी गरीब योजने च्या कार्ड साठी नागरिकांना माराव्या लागणाऱ्या चकरा कमी झाल्या आहेत. या ऑनलाईन सुविधे मुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचला आहे. तसेच पॅनलवरील रुग्णालयात देखील सुसूत्रता आली आहे. तरीही नागरिकांनी ऐन वेळेस कार्ड न काढता आधीच काढून घ्यावे आणि योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन या निमित्ताने नागरिकांना आहे.
– डॉ संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी.
COMMENTS