PMC Security Guard | सुरक्षा रक्षकांच्या वेतनाबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी ठरवून दिली नियमावली
PMC Security Guard | पुणे महापालिकेच्या सुरक्षा विभागामार्फत (PMC Security Department) पुरविण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय कामगारांचे वेतन (Salary) विहित वेळेत होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. बहुउद्देशीय कामगारांची हजेरी संबंधित खात्यांकडून विहित वेळेत प्राप्त होत नसल्याने कामगारांना महिनेमहा १० तारखेच्या आंत वेतन आदा करणे अडचणी होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार (IAS Dr Kunal Khemnar) यांनी नियमावली ठरवून दिली आहे. (PMC Security Guard)
अशी आहे नियमावली
१. सर्व संबंधित खात्यांकडून महिनेमहाची हजेरी २५ तारीख गृहित धरून संभाव्य हजेरी संबंधित खात्याचे पर्यवेक्षकीय अधिकारी/ विभागप्रमुख यांच्या स्वाक्षरीने देण्यात यावी. सदर हजेरी महिनेमहा महिन्याच्या ३० तारखेपर्यंत ठेकेदारास देण्याची तजवीज करावी.
२. ठेकेदाराने त्यांच्याकडील कंत्राटी कामगारांचे वेतन पुढील महिन्याच्या ५ तारखेपर्यंत आदा करण्याची
दक्षता घ्यावी.
३. संभाव्य हजेरीमध्ये कामगार गैरहजर राहिल्यास सदर गैरहजेरीचे वेतन त्याचे पुढील वेतनातून वसूल करण्याची कारवाई करण्यात करावी.
संबंधित खात्यांकडून विहित वेळेत हजेरी न मिळाल्यामुळे बहुउद्देशीय कामगारांचे वेतन करण्यामध्ये विलंब झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित खातेप्रमुखांची राहील. असे अतिरिक्त आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. (Pune Municipal Corporation News)

——
News Title | PMC Security Guard | Municipal Additional Commissioner has decided the rules regarding the salary of security guards