PMC RTI Nodal Officer | सामान्य प्रशासन विभागाला नकोय माहिती अधिकाराचे काम!

PMC Building

Homeadministrative

PMC RTI Nodal Officer | सामान्य प्रशासन विभागाला नकोय माहिती अधिकाराचे काम!

Ganesh Kumar Mule Aug 17, 2024 11:57 AM

DCM Ajit Pawar on Pune Rain | पावसामुळे दहावी-बारावीची परीक्षा न देऊ शकलेल्यांची स्वतंत्र परीक्षा घेणार | अजित पवार
PMC Pune Disaster Management | पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आपत्कालीन कार्यकेंद्र स्थापन होणार! | महापालिका आयुक्तांचे प्रशासनाला निर्देश
PMC Assistant Commissioner | सहाय्यक आयुक्तांचे अधिकार वाढवले | मुख्य खाते आणि क्षेत्रीय कार्यालयात समन्वय राखण्यासाठी महापालिका आयुक्तांचा निर्णय!

PMC RTI Nodal Officer | सामान्य प्रशासन विभागाला नकोय माहिती अधिकाराचे काम!

| आता कामगार कल्याण विभागाकडे असणार जबाबदारी

 

 

PMC GAD | (The Karbhari News Service) | पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation- PMC) माहिती अधिकार संबंधित कामकाज सामान्य प्रशासन विभागाकडून (PMC GAD) पाहिले जायचे. मात्र सामान्य प्रशासन विभागाला आता हे काम नको आहे. हे कामकाज आता कामगार कल्याण विभाग (PMC Labour Welfare Department) पाहणार आहे. याबाबत नुकतेच महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी आदेश जारी केले आहेत. (PMC General Administration Department)

माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये पुणे महापालिकेत माहिती अधिकार संबंधित कामकाज केले जाते. याची जबाबदारी म्हणून नोडल अधिकारी नियुक्त केला जातो. ह्या नोडल अधिकारी पदाची जबाबदारी २०२० सालापर्यंत गवनि विभागाचे उपायुक्त यांच्याकडे होती. मात्र माहिती अधिकार संबंधित बरीचशी माहिती ही सामान्य प्रशासन विभागाकडे असते. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त यांना नोडल अधिकारी करण्यात आले होते. मात्र सामान्य प्रशासन विभागाने आपल्यावरील ही जबाबदारी कमी करण्याची मागणी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली होती. त्यानुसार आता कामगार कल्याण विभागाकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त यांनी याबाबतचे आदेश नुकतेच जारी केले आहेत.

| माहिती अधिकाराचे काय करावे लागते कामकाज?

– राज्य माहिती आयोग, खंडपीठ पुणे यांचेकडील संपूर्ण महानगरपालिकेच्या दाखल द्वितीय अपिलाचे व तक्रारींचे अनुषंगाने संपूर्ण कामकाज पाहाणे (सुनावणी, आदेश, कार्यालय परिपत्रके, जन माहिती अधिकारी व प्रथम अपिल आधिकारी यांची माहिती इ.)

– माहिती अधिकार अर्ज, अपिल अर्ज याबाबत मासिक व वार्षिक अहवाल तयार करून राज्यशासन व मा. राज्य माहिती आयोग खंडपीठ पुणे यांजकडे पाठविणे.

– माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत कलम ४ ची पुणे मनपाकडील सर्व विभागांच्या माहितीवावत योग्य ती कार्यवाही करणे.

– माहिती अधिकार अधिनियमात प्राप्त ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज, अपिल अर्ज ऑनलाईन वर्ग करणे.

– माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत अर्जदार व नागरिक यांचेकडून प्राप्त तक्रारीचे अनुषंगाने कार्यवाही करणे.

– द्वितीय अपिल आदेशानुसार जन माहिती अधिकारी व अपिल अधिकारी यांचेवर होणाऱ्या कारवाईवावतचे प्रकरण तयार करुन महापालिका आयुक्त व अतिरिक्त महापालिका आयुक्त यांचेकडे सादर करणे.

– द्वितीय अपिलाचे आदेशातील शास्ती/नुकसान भरपाईचे प्रकरणाबाबत सर्व कामकाज करणे .

– शासनाने दिलेल्या आदेशाची व कार्यालय परिपत्रक यांची अंमलबजावणे करणे.

– प्रशिक्षण प्रबोधिनी यांचेशी समन्वय साधून माहिती अधिकार अधिनियमबाबत प्रशिक्षण
आयोजित करणे.

– माहिती व तंत्रज्ञान विभागाशी समन्वय साधून संकेतस्थळावरील माहिती अद्यावत करणे.

– nodalofficer.rti@punecorporation.org या ईमेलवरील नागरिक/खाते/सेवक याने मेलवर योग्य ती कार्यवाही करणे.

– माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत आवश्यक रेकॉर्ड/रजिस्टर नोंदी ठेव

– महाराष्ट्र शासनाच्या माहिती अधिकार अधिनियमच्या NIC सॉफ्टवेअरचे अनुषंगाने गर्व कामकाज पाहणे.

– याव्यतिरिक्त माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत वेळोवेळी करावे लागणारे सर्व कामकाज पाहणे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0