PMC Retrirement | जुलै महिन्यात महापालिकेचे (PMC) 73 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त!

Homeadministrative

PMC Retrirement | जुलै महिन्यात महापालिकेचे (PMC) 73 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त!

Ganesh Kumar Mule Aug 01, 2025 1:07 PM

ESIC Benefit | PMC Contract employees | कंत्राटी कामगारांना ईएसआईसी चे फायदे देण्यासाठी महापालिका पुढाकार घेईल| शिवाजी दौंडकर
PMC | PMPML | संचलन तूट पोटी पीएमपी ला ३० कोटी देण्याचा प्रस्ताव!
NCP Vs Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील जिथे दिसतील, तिथे घेराव घालणार  | पुणे राष्ट्रवादीचा इशारा 

PMC Retrirement | जुलै महिन्यात महापालिकेचे (PMC) 73 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त!

 

PMC Retired Employees – (The Karbhari News Service) – जुलै, 2025 महिन्यात पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) 73 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांसाठी महानगपालिका कामगार कल्याण विभागाच्या (PMC Labour Welfare Department) वतीने सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. (PMC Pune)

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून अरविंद शिराळकर, उपाध्यक्ष, अखिल भारतीय लघुउद्योग फेडरेशन, इंद्रभान रणदिवे, अधीक्षक अभियंता , सुनिल अहिरे, कार्यकारी अभियंता, डॉ. पंडित सोनकांबळे, वैद्यकीय अधिकारी, दत्तात्रय जगताप, शाखा अभियंता, हे उपस्थित होते.  नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी (Nitin Kenjale PMC) यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेवर बोलताना सेवापुर्ती समारंभाची पार्श्वभूमी सांगून सेवकांच्या भविष्यात मिळणाऱ्या रकमा, गुंतवणूक व नियोजन याची सविस्तर माहिती दिली. तसेच कोणत्याही सेवकास काही अडचण आल्यास त्यांनी कामगार कल्याण विभागास भेट द्यावी, असे आवाहन केले.

सेवानिवृत्त होणारे अधिकारी इंद्रभान रणदिवे,  सुनिल अहिरे,  दत्तात्रय जगताप, डॉ.पंडित सोनकांबळे, नितीन महाजन, सुरज कुलकर्णी यांनी पुणे महानगरपालिकेत केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुणे महानगरपालिकेचे आभार मानले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अरविंद शिराळकर यांनी पुणे शहरासाठी आपण सर्वांनी दिवस रात्र मेहनत करून रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज, दिवाबत्ती, आरोग्य, स्वच्छता इ. विविध सेवा पुरविल्या आहेत. याबद्दल आपणा सर्वांचे कौतुक आहे. सर्व सेवकांनी आपल्याला मिळणाऱ्या रकमेचे नियोजन करावे आपण सेवानिवृत्त होत असला तरी तुमची दुसरी इनिंग सुरू होत आहे. आपण नेहमी आनंदाने कामे केली पाहिजेत, कामात व्यस्त राहिले पाहिजे, कुटुंबाला वेळ दिला पाहिजे, आपल्या सहकार्यांना मार्गदर्शन केले पाहिजे असे सूचित करून सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर सर्व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना शॉल व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल कदम व नियोजन महेश मुंडलिक यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: