PMC Retirement | उपायुक्त जयंत भोसेकर यांच्यासह महापालिकेचे ४३ कर्मचारी आणि अधिकरी सेवानिवृत्त!

Homeadministrative

PMC Retirement | उपायुक्त जयंत भोसेकर यांच्यासह महापालिकेचे ४३ कर्मचारी आणि अधिकरी सेवानिवृत्त!

Ganesh Kumar Mule Jan 01, 2026 1:29 PM

One Day Salary | सर्व सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापला जाणार
Raj Thackeray’s morning Rally | राज ठाकरेंच्या सकाळच्या सभेमुळे भुवया उंचावल्या! 
Irrigation Dept Vs PMC | पाणी बिलाचा वाद महापालिकेच्या अंगलट! पाटबंधारे विभागाकडून अडवणूक करत दोन गावांचे पाणी तोडले

PMC Retirement | उपायुक्त जयंत भोसेकर यांच्यासह महापालिकेचे ४३ कर्मचारी आणि अधिकरी सेवानिवृत्त!

 

PMC Retired Employees – (The Karbhari News Service) -डिसेंबर, 2025 महिन्यात पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) 43 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांसाठी महानगपालिका कामगार कल्याण विभागाच्या (PMC Labour Welfare Department) वतीने सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. (PMC Pune)

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ व्याख्याते व कामगार क्षेत्रातील प्रसिद्ध वकील डॉ.श्रीकांत मालेगावकर, जयंत भोसेकर, उप आयुक्त, समाज विकास विभाग,  गणेश सोनुने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, डॉ. जयंत कांबळे वैद्यकीय अधिकारी  जयंत पवार, अध्यक्ष, सेवानिवृत्त सेवक संघ, हे उपस्थित होते.  नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी (Nitin Kenjale PMC) यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेवर बोलताना सेवापुर्ती समारंभाची पार्श्वभूमी सांगून सेवकांच्या भविष्यात मिळणाऱ्या रकमा, गुंतवणूक व नियोजन याची सविस्तर माहिती दिली. तसेच कोणत्याही सेवकास काही अडचण आल्यास त्यांनी कामगार कल्याण विभागास भेट द्यावी, असे आवाहन केले व सर्वाना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सेवानिवृत्त होणारे अधिकारी राजेश भुतकर, डॉ. जयंत कांबळे,  संजय गायकवाड, श्रीमती अरुणा जाधव, श्रीमती मिथिला रानडे यांनी पुणे महानगरपालिकेत केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुणे महानगरपालिकेचे आभार मानले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. मालेगावकर यांनी सर्व सेवक सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत परंतु कामातून सेवानिवृत्त होत नाही याची दखल घ्यावी. प्रत्येक कर्मचाऱ्यांनी नव्या उमेदीने कार्यरत राहिले पाहिजे असे नमूद करून सेवकांनी आपल्याला मिळणाऱ्या वेळेचे नियोजन करावे. आपण नेहमी आनंदाने कामे केली पाहिजेत, कुटुंबाला वेळ दिला पाहिजे, आनंदाने राहिले पाहिजे, जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधला पाहिजे, आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, कामात व्यस्त राहिले पाहिजे, याबाबत अनेक विचारवंतांची उदाहरणे देऊन सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर सर्व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना शॉल व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित चव्हाण, उप कामगार अधिकारी यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: