PMC Retirement | नोव्हेंबर महिन्यात पुणे महापालिकेचे 35 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त!

Homeadministrative

PMC Retirement | नोव्हेंबर महिन्यात पुणे महापालिकेचे 35 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त!

Ganesh Kumar Mule Nov 28, 2025 9:29 PM

The idea of ​​Hindu Rashtra | हिंदुराष्ट्राची कल्पना गांधी विचारांना अभिप्रेत नाही – प्रा. डॉ. शंकर कुमार संन्याल यांचे प्रतिपादन
‘Basic Literacy and Numeracy’ exhibition | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘जी-२०’ निमित्ताने ‘पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र’ या प्रदर्शनाचे उद्घाटन
Punyabhushan | ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना २०२३ चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

PMC Retirement | नोव्हेंबर महिन्यात पुणे महापालिकेचे 35 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त!

 

PMC Retired Employees – (The Karbhari News Service) – नोव्हेंबर महिन्यात पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) 35 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांसाठी महानगपालिका कामगार कल्याण विभागाच्या (PMC Labour Welfare Department) वतीने सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. (Pune Municipal Corporation – PMC)

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून निखील मोरे,उप आयुक्त, भू संपादन व व्यवस्थापन, संगीता पाटील, कार्यकारी अभियंता,  रोहिदास देवडे, मुकुंद शिंदे, उप अभियंता, जयंत पवार, अध्यक्ष, सेवानिवृत्त सेवक संघ, हे उपस्थित होते. नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी (Nitin Kenjale PMC) यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेवर बोलताना सेवापुर्ती समारंभाची पार्श्वभूमी सांगून सेवकांच्या भविष्यात मिळणाऱ्या रकमा, गुंतवणूक व नियोजन याची सविस्तर माहिती दिली. तसेच कोणत्याही सेवकास काही अडचण आल्यास त्यांनी कामगार कल्याण विभागास भेट द्यावी, असे आवाहन केले व सर्वाना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

सेवानिवृत्त होणारे अधिकारी  संगीता पाटील,  रोहिदास देवडे, राजू अडागळे यांनी पुणे महानगरपालिकेत केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुणे महानगरपालिकेचे आभार मानले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  निखील मोरे यांनी सर्व सेवकांनी आपल्याला मिळणाऱ्या वेळेचे नियोजन करावे. आपण नेहमी आनंदाने कामे केली पाहिजेत, कुटुंबाला वेळ दिला पाहिजे, आनंदाने राहिले पाहिजे, आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, कामात व्यस्त राहिले पाहिजे, असे नमूद करून सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर सर्व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना शॉल व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा कायटे व नियोजन महेश मुंडलिक यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: