PMC Retired Employees | पुणे महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त वेतनधारकांना  प्रशासनाचे आवाहन 

Homeadministrative

PMC Retired Employees | पुणे महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त वेतनधारकांना  प्रशासनाचे आवाहन 

Ganesh Kumar Mule Nov 06, 2025 4:13 PM

PMC Retired Employees | Pension | पुणे महानगरपालिकेच्या निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक सेवकासाठी महत्वाची बातमी!
PMC Retired Employees Notional increment | 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तिवेतन निश्चित करण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून नियमावली जाहीर! 
PMC Pension | पेन्शन प्रकरणे प्रलंबित ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा

PMC Retired Employees | पुणे महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त वेतनधारकांना  प्रशासनाचे आवाहन

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या सेवानिवृत्ती धारकांना महापालिकेच्या लेखा व वित्त विभागाने  हयातीच्या दाखल्याबाबत आवाहन केले आहे. कारण  निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांनी वर्षातून एकदा हयातीचे दाखले/ हयातीचे प्रमाणपत्र महापालिकेकडे सादर करणे अनिवार्य आहे. (PMC Pension)

विहित मुदतीत हयातीचे दाखले सादर न केल्यास त्यापुढील महिन्यांचे निवृत्तिवेतनाचे प्रदान हे हयातीचे दाखले सादर केल्यानंतरचं केले गेले पाहिजे, असे स्पष्ट  आहे. सबब, महापालिकेच्या सर्व निवृत्तिवेतनधारकांनी तसेच कुटुंब निवृत्तिवेतनधारकांनी त्यांचे हयातीचे दाखल्यासह पुनर्नियुक्तीचे दाखले पुणे महापालिकेस सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार  पुणे महानगरपालिकेच्या सर्व निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांना आवाहन करण्यात आले आहे की, सर्व निवृत्तिवेतनधारकांनी तसेच कुटुंब निवृत्तिवेतनधारकांनी त्यांचे हयातीचे दाखल्यासह पुनर्नियुक्तीचे दाखले  १० नोव्हेंबर पासून  ते  ३१ डिसेंबर या कालावधीत कार्यालयीन वेळेत  दाखल करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

१) कार्यालयीन वेळेत स्वतःचे निवृत्तिवेतन जमा होणाऱ्या बँकेमार्फत अथवा निवृत्तिवेतन विभाग, मुख्य लेखा व वित्त विभाग, पुणे महानगरपालिका येथे समक्ष उपस्थित राहून सादर करावयाचे आहे.
२) इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (IPPB) ने निवृत्तिवेतनधारकासाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र (हयातीचा दाखला) ही सेवा घरपोच किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर सेवा आधार सक्षम बायोमेट्रिक प्रमाणिकरण आधारित असून पेन्शनधारक नाममात्र शुल्क रक्कम रु. ७०/- अदा करून डिजिटल जीवन प्रमाणपत्र प्राप्त करू शकतात.
३) निवृत्तिवेतनधारक/ कुटुंब निवृत्तिवेतनधारक PMC LIFE CERTIFICATE APP द्वारे डिजिटल पद्धतीने हयातीचे दाखले सादर करू शकतात.

मुदतीत  दाखले सादर न केल्यास त्यापुढील महिन्यांचे निवृत्तिवेतनाचे प्रदान हे हयातीचे दाखले सादर केल्यानंतरच करणेत येईल, याची नोंद घ्यावी. असे सह महापालिका आयुक्त तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांनी म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: