PMC Recruitment Rules | पुणे महापालिकेत नवीन पद निर्मिती! | परिमंडळ आरोग्य अधिकारी ची नवीन ५ पदे 

Homeadministrative

PMC Recruitment Rules | पुणे महापालिकेत नवीन पद निर्मिती! | परिमंडळ आरोग्य अधिकारी ची नवीन ५ पदे 

Ganesh Kumar Mule Sep 18, 2024 9:31 PM

PMC Health Department | उष्माघाता पासून (Heat Stroke) स्वत:चा व स्वत:च्या कुटुंबीयांचा बचाव करा | पुणे महापालिका आरोग्य विभागाचे आवाहन
Pune Sex Ratio | सांस्कृतिक राजधानीत मुलींच्या जन्माच्या प्रमाणात होत चालली घसरण! | राज्य सरकारने फटकारले | 2022 साली 1 हजार मुलांमागे फक्त 910 मुली, तर चालू वर्षात फक्त 863 मुली 
Asha workers’ salary is continuously delayed by the PMC health department!

PMC Recruitment Rules | पुणे महापालिकेत नवीन पद निर्मिती! | परिमंडळ आरोग्य अधिकारी ची नवीन ५ पदे

| १००% पदोन्नतीने भरली जाणार पदे

Pune Municipal Corporation Service Rules – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यात (PMC Health Department) नवीन ५ पदे तयार करण्यात आली आहेत.  खात्यात परिमंडळ (झोन) निहाय सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा परिमंडळ आरोग्य अधिकारी  (वर्ग-१) (Zonal Health Officer) या पदाची निर्मिती व सेवाप्रवेश नियम तयार करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून याबाबतचा निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. दरम्यान ही पदे १००% पदोन्नतीने भरली जाणार आहेत. क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी या पदांच्या कामाचा ८ वर्षाचा अनुभव असणान्या अधिकाऱ्यामधून सेवाज्येष्ठतेने हे पद भरले जाणार आहे. (Pune Municipal Corporation- PMC)
 

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांचे सेवाप्रवेश नियम व आकृतीबंध तयार करण्यात आलेले आहेत. दरम्यान महापालिका आयुक्त यांचेकडून  आरोग्य खात्याकडील परिमंडळ (झोन) निहाय सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा परिमंडळ आरोग्य अधिकारी (वर्ग-१) या पदाची निर्मिती व सेवाप्रवेश नियम लागू करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने परिमंडळ (झोन) निहाय सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा परिमंडळ आरोग्य अधिकारी (वर्ग-१) या पदाची निर्मिती, वेतनश्रेणी, त्या पदाच्या शैक्षणिक व इतर अर्हता मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत शासनाने  निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रियांका कुलकर्णी छापवाले, उप सचिव, महाराष्ट्र शासन यांनी हा निर्णय जारी केला आहे. (Pune PMC News)


| क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी पदाचा ८ वर्षाचा अनुभव आवश्यक

 
दरम्यान ही पदे १००% पदोन्नतीने भरली जाणार आहेत. याचा फायदा सद्यस्थितीत क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच होणार आहे. मात्र त्यासाठी ८ वर्ष अनुभवाची अट ठेवण्यात आली आहे. हे पद वर्ग १ चे असून वेतन श्रेणी ही एस – २३ अशी आहे. ६७७०० पासून ते २ लाख ८ हजार ७०० असे वेतन या पदासाठी असणार आहे.

नेमणूकी करिता अर्हता व नेमणुकीची पद्धत अशी असेल


१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.B.B.S पदवी.
२) मनपा आस्थापनेवर कार्यरत असणाऱ्या क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी या पदांच्या कामाचा ८ वर्षाचा अनुभव असणान्या अधिकाऱ्यामधून सेवाज्येष्ठतेने.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0