PMC Pune Transgender Employees | पुणे महापालिका 25 तृतीयपंथीयांना घेणार कामावर!
| सुरक्षा विभागाच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांची मान्यता
PMC Pune Transgender Employees | पुणे महानगरपालिकेच्या (Pune municipal corporation) सेवेत तृतीयपंथी व्यक्तींना (Transgender) कंत्राटी सेवक (Contract employee) म्हणून रुजू होणार आहेत. पुणे महानगरपालिकेने (PMC Pune) एक पुरोगामी पाउल उचलण्याचा मानस असून समाजातील सर्वच वर्गाना नागरिक हक्क कायद्यानुसार समानतेची वागणूक मिळावी या उद्देशाने तृतीयपंथी व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणणे कामी मनपाच्या मिळकतीचे संरक्षणार्थ प्रायोगिक तत्वावर २५ तृतीयपंथी व्यक्तींना कामावर घेतले जाणार आहे. या बाबतच्या सुरक्षा विभागाच्या प्रस्तावावर प्रशासक तथा आयुक्त विक्रम कुमार (PMC commissioner Vikram Kumar) व अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) कुणाल खेमनार (PMC Additional commissioner Dr Kunal Khemnar) यांनी २५ तृतीयपंथी व्यक्तींना तातडीने ठेकेदारामार्फत कामावर रुजू करून घेण्यास व उर्वरितांना टप्याटप्याने कामावर घेण्यास मान्यता दिली आहे. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप (Deputy Commissioner Madhav Jagtap) यांनी दिली. (PMC Pune Transgender Employees)
व्यक्तींना नेमणूक दिली जाणार आहे. सध्या कार्यरत असलेल्या सैनिक सेक्युरिटी प्रा.लि. व इगल सेक्युरिटी प्रा.लि. या खाजगी कंपनी कडून वेतन तसेच सरकारी देय देणे दिली जाणार आहेत.