PMC Pune RFD project | चला पुणे महापालिकेचा नदीकाठ सुधारणा प्रकल्प समजून घेऊया!

HomeBreaking Newsपुणे

PMC Pune RFD project | चला पुणे महापालिकेचा नदीकाठ सुधारणा प्रकल्प समजून घेऊया!

Ganesh Kumar Mule Jun 07, 2023 5:48 AM

PMC Chief Labour Officer | अखेर नितीन केंजळे यांची महापालिकेच्या मुख्य कामगार अधिकारी पदी पदोन्नतीने नियुक्ती 
PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेने गेल्या 7 दिवसांत नागरिकांकडून साडे सहा लाखांचा दंड केला वसूल | कारण घ्या जाणून
Women Self Help Group | Hari Sawant | हडपसर परिसरात गोरगरीब महिलांचे बचत गट | भटक्या विमुक्त जाती जमाती सामाजिक आधार संघटनेचा पुढाकार 

PMC Pune RFD project | चला पुणे महापालिकेचा नदीकाठ सुधारणा प्रकल्प समजून घेऊया!

| पुणे नदी पुनरुज्जीवन च्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

PMC Pune RFD project | यंदाच्या पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) पुणे नदी पुनरुज्जीवन (Pune river revival ) तर्फे दिनांक ३ ते ५ जून तीन दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये नागरिकांनी पुणे महापालिकेचा नदी काठ सुधारणा प्रकल्प (PMC Pune River front Devlopment Project) समजून घ्यावा, हा उद्देश होता. अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली. (PMC Pune RFD Project)
संस्थेने दिलेल्या माहितीनुसार ३ जून शनिवार रोजी सकाळी ७.३० वा मुठेच्या काठावरील (Mutha River) घोरपडे घाट भांबुर्डा येथे घाट स्वच्छता  तसेच घाटाचा इतिहास व वारसामूल्य (History and legacy) समजून घेणे या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  मराठा साम्राज्याचे (Maratha Empire) सरसेनापती संताजी घोरपडे (Sarsenapati Santaji Ghorpade) यांच्या वंशजांनी  इ. स. १८३१ फेब्रुवारी महिन्यात या देखण्या घाटाचे बांधकाम केले. पानशेतच्या पुरामधे १९६१ साली याचा मंदिराचा भाग उन्मळून पडला ज्याचे भग्नावशेष आजही दिसत आहेत..समस्त हजर नागरिकांस पुणे मनपाच्या नदी सुशोभीकरण प्रकल्पानुसार भविष्यात  घाटाच्या जागी नागरिकांसाठी व्यायाम आणि मनोरंजनाच्या जागांची निर्मिती करण्याचे योजिले आहे हे छायाचित्रांवरून दाखवण्यात आले. त्यानुसार घाटाचे वारसा महत्व निघून जाणार हे लक्षात आले. (Pune Municipal Corporation)
दिनांक ४ जून रविवार रोजी संध्याकाळी ५.०० वा मुळा- मुठेच्या बंडगार्डन किनार्‍यावर फेरफटका हा कार्यक्रम आयोजिला होता. पुणे मनपानी हाती घेतलेल्या नदी सुशोभिकरण प्रकल्पातून नदीचे स्वरूप मुक्त वाहती सुंदर नदी असे न होता नदीकाठाचा होणारा विध्वंस प्रत्यक्ष अनुभवणे हा या कार्यक्रमाचा हेतू होता. तसेच राष्ट्रीय हरित प्राधिकरणाच्या वृक्षतोड स्थगिती आदेशाचे साजरीकरणही करण्यात येणार होते. यावेळी नागरिकांना नदीपात्रातील दगडी बंधारे नदीच्या पाणीपातळीपासून नदीकाठाची दगडमाती टाकून वाढवण्यात आलेली उंची तसेच वृक्षांना देण्यात आलेले क्रमांक इ दिसून आले. यामागील सुशोभीकरणाच्या प्रकल्पाच्या हेतुंबद्दल  प्रश्न व उत्तरे या रूपात चर्चा करण्यात आली. (PMC Pune News) 
दिनांक ५ जून सोमवार संध्याकाळी ४.३० वा राजीव गांधी उद्यान होळकर पूल येथे ‘पेंट द रिव्हर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जगप्रसिद्ध चित्रकार मिलिंद मुळीक व अन्य ज्येष्ठ तसेच काही छोट्या चित्रकारांनी होळकर पूलापासच्या या उद्यानात मुळेच्या नदीकाठाचे सौंदर्य चित्रित करून आपला सहभाग दिला. (PMC Pune Marathi News)
या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे चित्रकार मुळीक यांच्यासह सर्वही चित्रकारांनी आपली चित्रे संस्थेच्या प्रयत्नांना आर्थिक बळ देण्यासाठी देणगी स्वरूपात दिली. सदर चित्रांची जागेवरच विक्री घोषित केली असता उपस्थितांनी त्यास उत्स्फूर्तपणे मनापासून दाद दिली.
तीन्ही दिवशी उपस्थितानी शपथ घेतली-
मी झाडे तोडणार नाही, इतराना तोडू देणार नाही, झाडे वाचवू, नद्या जगवू, आपण जगू, पर्यावरणाचे रक्षण करू. (Pune News)
News Title | PMC Pune RFD project |  Let’s understand the river bank improvement project of Pune Municipal Corporation!