PMC Pune News | अनावश्यक खोदाई केल्यास कारवाई | अतिरिक्त महापालिका आयुक्तांचा इशारा

HomeBreaking Newsपुणे

PMC Pune News | अनावश्यक खोदाई केल्यास कारवाई | अतिरिक्त महापालिका आयुक्तांचा इशारा

Ganesh Kumar Mule Jul 31, 2023 4:38 AM

Pune Road Devlopment | पुण्याच्या रस्ते विकासातील २ मोठे अडथळे दूर! | अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची माहिती 
Nagar Road BRTS | पुणे महापालिकेकडून नगर रोड बीआरटी मार्ग हटवण्याचे काम सुरू | पावणे तीन वर्षांपासून मार्ग होता बंद
Vilas Kanade | लघुलेखक ते अतिरिक्त महापालिका आयुक्त… एक स्वप्नवत प्रवास…! | पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाला एका उंचीवर नेऊन ठेवण्यात महत्वाची भूमिका

PMC Pune News | अनावश्यक खोदाई केल्यास कारवाई | अतिरिक्त महापालिका आयुक्तांचा इशारा

PMC Pune News | पावसाळा (Monsoon) संपेपर्यंत आवश्यक तेथेच खोदाई (Trenching) करण्यात यावी. अनावश्यक खोदाई टाळावी असे निर्देश  अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) विकास ढाकणे (PMC Additional Commissioner Vikas Dhakane) यांनी दिले आहेत. तसेच खोदाई करताना ठेकेदार बोर्ड लावत नाहीत. अशा ठेकेदारावर (Contractor) कारवाई करण्याचेही आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. (PMC Pune News)

शहरातील खोदाई बाबत अतिरिक्त आयुक्तांनी पथ, विद्युत आणि मलनिःस्सारण विभागासोबत बैठक घेतली. यावेळी हे आदेश देण्यात आले. शहरातील वाहनांची संख्या सुमारे ५० ते ५५ लाख व बाहेरून दररोज कामासाठी येणाऱ्या वाहनांची संख्या सुमारे १० लाख अशी सुमारे ६० ते ६५ लाख वाहनांची वर्दळ शहरात असते. शहरातील रस्त्यांची खोदाई करताना निविदा अटी व शर्तीनुसार ठेकेदाराचे कामाचे ठिकाणी बोर्ड लावणे आवश्यक आहे. परंतु ठेकेदारामार्फत कोणत्याही प्रकारचे बोर्ड कामाचे ठिकाणी लावले जात नाहीत. बोर्ड लावणेची कार्यवाही करण्यात यावी. बोर्डवर कामाचे नाव,काम सुरू दिनांक, पूर्ण दिनांक, ठेकेदाराचे नाव दुरध्वनी क्रमांक इ. सर्व माहिती नमूद असावी. तसेच खोदाईचे ठिकाणी आवश्यक ते बॅरिकेटिंग करण्यात येवून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात. यामुळे नागरिकांचा रोष कमी होण्यास मदत होईल. असे अतिरिक्त आयुक्तांनी निर्देश दिले. (PMC Road Department) 

पथ, पाणीपुरवठा, मलनि:सारण, विद्युत यांनी खोदाईबाबत समन्वय करून पुढील एक महिन्यात करावयाच्या खोदाईबाबत कार्यक्रम ( Programme ) तयार करावा. त्याव्यतिरिक्त खोदाई केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. कोणता विभाग कोठे खोदाई करणार आहे याबाबत समन्वय करण्यात यावा. विदयुत विभागाचे ATMS चे काम चालू आहे. रिईनस्टेटमेंटचे काम व्यवस्थित झालेले नाही. रिईनस्टेटमेंटची कामे शास्त्रोक्त पध्दतीने होत नाहीत. रिईनस्टेटमेंटच्या कामाची कनिष्ठ अभियंता यांनी तपासणी करणे आवश्यक आहे. सिंहगड रोडबाबत वर्तमानपत्रात बऱ्याच बातम्या प्रसिध्द होत असून पथ विभागाने याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे व खड्डे दुरूस्तीबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. असे ही अतिरिक्त आयुक्तांनी आदेश दिले आहेत. (Pune Municipal Corporation) 
—/–
News Title | PMC Pune News | Action in case of unnecessary digging Warning of Additional Municipal Commissioner