PMC Pune | वाहन चालकांच्या आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका आयुक्तांकडून नवीन नियमावली!

HomeBreaking Newsपुणे

PMC Pune | वाहन चालकांच्या आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका आयुक्तांकडून नवीन नियमावली!

कारभारी वृत्तसेवा Dec 29, 2023 2:10 AM

Monkeypox virus | PMC | मन्कीपॉक्स बाबत पुणे महापालिका सजग | नायडू हॉस्पिटलला सतर्क राहण्याच्या सूचना 
PMC Pune Recruitment | पोटनिवडणूक संपल्यानंतर पुणे महापालिकेच्या भरतीची जाहिरात!  | जवळपास 300 विविध पदांसाठी होणार भरती 
PMC Security Guard | सुरक्षा रक्षकांच्या वेतनाबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी ठरवून दिली नियमावली

PMC Pune | वाहन चालकांच्या आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका आयुक्तांकडून नवीन नियमावली!

PMC Pune | सार्वजनिक रस्त्याच्या कडेला सुरु असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या वाहन चालकांच्या तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याबाबत महापालिका आयुक्तांनी (PMC Commissioner) नवीन नियमावली आखून दिली आहे. पुलाच्या बांधकामाच्या वेळी सिंहगड रोडवर एका व्यक्तीच्या डोक्यात रॉड पडला होता. तर बाणेर परिसरात इमारतीच्या बांधकामात शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. हे टाळण्यासाठी या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. (Pune Municipal corporation)

पुणे महापालिका (Pune PMC) हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम प्रकल्पांचे कामकाज चालू आहे. तसेच पुणे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. सार्वजनिक रस्त्याच्या कडेला सुरु असलेल्या इमारत बांधकाम प्रकल्पामधून वस्तू / माल मटेरियल खाली पडून अपघात होण्याची शक्यता आहे. अशा अपघातामध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारी / वाहन चालक हे जखमी / दगावण्याची शक्यता असते.  त्यामुळे सार्वजनिक रस्त्यावरुन जाणाऱ्या पादचारी / वाहन चालक यांच्या सुरक्षिततेसाठी फुटपाथवरील भाग संरक्षित करणेसाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात याव्यात असे आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. सर्वच खात्याना याबाबत आदेश देण्यात आले आहेत. (Vikram Kumar IAS)
१) सार्वजनिक रस्त्यालगत इमारत बांधकाम सुरु असलेल्या मिळकती समोरील फुटपाथच्या भागामध्ये स्ट्रक्चरल स्टील व पत्रे यांचा वापर करुन टनेलसारखी व्यवस्था करणे.
२) सदर टनेलसाठी स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून डिझाईन करून योग्य आकाराच्या स्ट्रक्चरल सेक्शन्स् व योग्य जाडीचा पत्र्याचा वापर करणे आवश्यक आहे.
३) सार्वजनिक रस्त्यालगतच्या इमारत बांधकाम प्रकल्पांमध्ये तळमजल्यावरील बांधकाम करताना इमारतीच्या दर्शनी सामासिक अंतर व इतर सामासिक अंतरे यामध्ये वरील मजल्यावरुन माल मटेरियल / वस्तू पडून दुर्घटना घडू नये यासाठी योग्य आकाराची भारतीय मानक ब्युरोमधील तरतूदीनुसार जाळी / स्ट्रक्चरल स्टीलमध्ये पत्रे टाकून संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात यावी.
४) बांधकाम परवानगी वेळी सार्वजनिक रस्त्यालगतच्या इमारत बांधकाम प्रकल्पांसाठी वरीलप्रमाणे अटीवर बांधकाम परवानगी अनुज्ञेय करण्यात यावी.