PMC Pune Municipal Secretary | 3 वर्षे होत आली तरी पुणे महापालिकेला पूर्ण वेळ नगरसचिव मिळेना!

HomeBreaking Newsपुणे

PMC Pune Municipal Secretary | 3 वर्षे होत आली तरी पुणे महापालिकेला पूर्ण वेळ नगरसचिव मिळेना!

Ganesh Kumar Mule May 18, 2023 6:55 AM

Contract Employees | मनपा व्हेईकल डेपोमधील कंत्राटी कामगार व बिगारी करणार निदर्शने
Pune PMC Helmet News | कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांना देखील हेल्मेट सक्तीचे केल्याने पुणे महापालिकेत उद्भवले वादाचे प्रसंग!
UDPCR | Pune News | 20 टक्के झोपडपट्टी टीडीआर वापरण्याची केलेली सक्ती रद्द करा | माजी नगरसेवकांची मुख्यमंत्र्याकडे मागणी 

PMC Pune Municipal Secretary | 3 वर्षे होत आली तरी पुणे महापालिकेला पूर्ण वेळ नगरसचिव मिळेना!

| पद भरतीच्या माध्यमातून कधी भरणार पद?

PMC Pune Municipal Secretary | (Author : Ganesh Mule) | पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) पूर्ण वेळ नगरसचिव (Full Time Municipal secretary) असणारे सुनील पारखी (Sunil Parkhi) 30 ऑगस्ट 2020 ला निवृत्त झाले. तसेच उप नगरसचिव देखील निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी नवीन नगरसचिव नेमण्यासाठी महापालिकेकडून भरती प्रक्रिया (PMC Pune Recruitment) राबवण्यात आली होती. त्यानुसार या पदभरतीबाबत जाहिरात देण्यात आली होती.  परंतु एकही उमेदवार सक्षम आढळला नाही.  नगरसचिवांच्या कामकाजाची माहिती कोणालाच नव्हती.  या कारणास्तव ही प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. त्यानंतर अद्याप कोणतीही प्रक्रिया केली गेली नाही. 3 वर्ष होत आली देखील महापालिकेला (PMC Pune) हे पद भरता आले नाही. महापालिकेने प्रभारी पदभार देऊन काम चालवले. मात्र पुन्हा पद भरती बाबत जाहिरात दिली नाही. महापालिकेचे एवढे महत्वाचे पद असताना देखील याबाबत महापालिका प्रशासनाची उदासीनता लक्षात येत आहे. (PMC Pune Municipal Secretary)

 – भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली होती

पारखी निवृत्त झाल्यानंतर महापालिकेने  नगरसचिवांच्या नियुक्ती प्रक्रियेबाबत प्रशासनाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यानुसार पद भरती प्रक्रिया जलद करण्यात आली होती.  त्याची जाहिरात काढण्यात आली.  महापालिकेकडे एकूण 42 अर्ज आले होते.  यातील बहुतांश अर्ज महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे होते.   अर्ज तपासल्यानंतर 29 लोक त्यात पात्र ठरले.  पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.  परंतु नंतर ही प्रक्रिया अनेक दिवस पुढे जाऊ शकली नाही.  त्यानंत ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. कारण 29 पैकी एकाही उमेदवाराला नगरसचिवांच्या कामकाजाची माहिती नव्हती. यामुळे, आता एक नवीन प्रक्रिया राबवली जाईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यानंतर अद्याप कोणतीही प्रक्रिया केली गेली नाही. 3 वर्ष होत आली तरी देखील महापालिकेला हे पद भरता आले नाही. याबाबत महापालिकेची उदासीनता लक्षात येत आहे. सध्या प्रभारी नगरसचिवम्हणून शिवाजी दौंडकर (Shivaji Daundkar) काम पाहत आहेत. दौंडकर देखील मे महिन्याच्या शेवटी सेवानिवृत्त होत आहेत. हे माहित असताना महापालिकेकडून तीन महिने अगोदरच याची भरती प्रक्रिया करणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाने तसा कुठलाही निर्णय घेतला नाही. प्रशासनाच्या या भूमिकेबद्दल मात्र प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. (PMC Pune news)

| उपनगरसचिव पद देखील रिक्तच

नगरसचिव पारखी निवृत्त झाल्यानंतर दुसऱ्याच महिन्यात म्हणजे सप्टेंबर 2020 मध्ये उपनगरसचिव राजेंद्र शेवाळे (Rajendra Shewale) सेवानिवृत्त झाले होते. तेव्हापासून हे पद देखील रिक्तच आहे. याचाही प्रभारी पदभार देण्यात आला आहे. महापालिकेचे राजशिष्टाचार अधिकारी योगिता भोसले (Protocol officer Yogita Bhosale) या प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. महापालिकेच्या नियमानुसार नगरसचिव हे उपनगरसचिव यांची नियुक्ती करत असतात. मात्र जिथे नगरसचिव नाहीत तिथे उपनगरसचिव यांची कोण नेमणूक करणार? आता हे पद पदोन्नती ने भरले जाणार कि अजून दुसऱ्या कुठल्या प्रक्रियेने, याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. (PMC Pune Deputy Municipal secretary)

– महापालिकेत नगरसचिव  पद महत्वाचे

 महानगरपालिकेच्या कामकाजात नगरसचिव हे पद अत्यंत महत्वाचे आहे. (Pune Municipal Corporation Municipal secretary) महापालिका आयुक्तांनंतर नगरसचिव हे पद महत्त्वाचे आहे.  प्रशासनाच्या तसेच महापौरांसह राजकीय लोकांच्या समन्वयाची जबाबदारी नगरसचिवावर असते.  महासभा, महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या नियोजनापासून ते त्याचे कार्यपत्रक प्रकाशित करण्यापर्यंत, सभेचे संघटन, त्याच्याशी संबंधित निवडणूक प्रक्रिया, विशेष विषय समित्यांची प्रक्रिया आणि त्याच्या निवडणुकीची प्रक्रिया देखील नगरसचिव करतात. महापौर कार्यालयाचे सर्व काम देखील नगरसचिव करतात.  यामुळे महानगरपालिकेच्या कामकाजात नगरसचिवाची भूमिका महत्त्वाची मानली जाते.
—-
News Title | PMC Pune Municipal Secretary  Even after 3 years, the Pune Municipal Corporation did not get a full-time municipal secretary!  |  When will the post be filled through recruitment?