PMC Pune Employees Union | अतिक्रमण विभागातील मारहाणीचा सर्व महापालिका संघटना उद्या करणार निषेध!
PMC Pune Employees Union | पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) आणि अतिक्रमण निरीक्षक (Encroachment Inspector) यांना कर्त्तव्य बजावत असतांना मारहाण करण्यात आली. त्याचा उद्या सकाळी 11 वा. हिरवळीवर शांततामय मार्गाने निषेध केला जाणार आहे. यात सर्व संघटना सहभागी होणार आहेत. यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सर्व संघटना कडून करण्यात आले आहे. (PMC Pune Employees Union)
पुणे महापालिका कामगार यूनियन (मान्यताप्राप्त), पी एम सी एम्प्लॉईज युनियन, पुणे महानगरपालिका अभियंता संघ, पुणे महानगरपालिका अधिकारी संघ, डॉक्टर असोसिएशन, पुणे महापालिका मागासवर्गीय संघटना अशा सर्व संघटना यात सहभागी होणार आहेत. काल अतिक्रमण विभागात महापालिका कर्मचारी आणि RTI कार्यकर्ता यांच्या मारहाण झाली. अशा घटना घडत असल्याने महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे काम करणे अवघड झाले आहे. याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात येणार आहे. असे संघटना कडून सांगण्यात आले. (PMC Pune News)
News Title | PMC Pune Employees Union | All municipal organizations will protest the beating in the encroachment department tomorrow!