PMC Pune Employees Promotion |  अधिक्षक, उपअधिक्षक, प्रशासन अधिकारी यांच्या पदोन्नतीचा मार्ग अखेर मोकळा! | महापालिकेच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मंजूरी

HomeपुणेBreaking News

PMC Pune Employees Promotion | अधिक्षक, उपअधिक्षक, प्रशासन अधिकारी यांच्या पदोन्नतीचा मार्ग अखेर मोकळा! | महापालिकेच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मंजूरी

Ganesh Kumar Mule Aug 23, 2023 12:38 PM

Hunger Strike | MLA Sunil Tingre | महापालिका प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आमदार सुनिल टिंगरे यांचे लाक्षणिक उपोषण मागे!
PMC Pune Bharti Exam 2023 | पहिल्या सत्रात ७२% तर दुसऱ्या सत्रात ८०% उमेदवारांनी दिली परीक्षा! 
Pune Mahanagarpalika Bharti Results 2023 | पुणे महापालिकेकडून भरती प्रक्रियेसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतील सर्वच पदाचा निकाल घोषित!

PMC Pune Employees Promotion |  अधिक्षक, उपअधिक्षक, प्रशासन अधिकारी यांच्या पदोन्नतीचा मार्ग अखेर मोकळा! | महापालिकेच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मंजूरी

| पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा

PMC Pune Employees Promotion | (Author: Ganesh Mule) | पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) प्रशासकीय सेवा या संवर्गातील “अधिक्षक” (Superintendent) (वर्ग-३) व “प्रशासन अधिकारी” (Administration Officer) (वर्ग-२), उपअधीक्षक (Deputy Superintendent) , वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) या पदावर तात्पुरती पदोन्नतीदेण्याबाबतचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.  महापालिकेच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. ‘द कारभारी’ वृत्तसंस्थेने (The Karbhari) हा विषय लावून धरला होता. त्यानुसार प्रशासन आता अधिक्षक, उप अधिक्षक, प्रशासन अधिकारी, वरिष्ठ लिपिक यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया पुन्हा सुरु करणार आहे.  महापालिका कर्मचाऱ्यांना हा चांगला दिलासा आहे. (PMC Pune Employees Promotion)

| महापालिकेने सरकार कडून मागवले होते मार्गदर्शन

पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील प्रशासकीय सेवा या संवर्गातील ज्या अधिकारी / कर्मचारी यांना निम्न संवर्गातील पदावर मानीव दिनांक मंजुर केल्याने ते सध्या त्यांच्या उच्च पदाच्या पदोन्नतीच्या विचाराधीन कक्षेत आले आहेत. त्यांना निम्न संवर्गातील ३ वर्षाचा कामाचा प्रत्यक्ष अनुभव नसताना पदोन्नती द्यावी अगर कसे याबाबत महापालिका प्रशासनाकडून राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागितले होते. (PMC Pune Marathi News)
या अनुषंगाने सरकारने कळवले होते की, पुणे महानगरपालिकेच्या सेवा प्रवेश नियमात पदोन्नतीदेताना “निम्न पदावरील ३ वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक” अशी तरतुद आहे. निम्न संवर्गातील पदावर मानीव दिनांक मंजुर केल्याने उच्च पदाच्या पदोन्नतीकक्षेत आलेल्या अधिकारी / कर्मचारी यांना कामाचा प्रत्यक्ष अनुभव नसताना पदोन्नती देण्यासाठी सेवाप्रवेश नियमात सदर अर्हतेमध्ये “निम्न पदावरील ३ वर्षांची नियमित सेवा” असा बदल करणे आवश्यक आहे. (Pune Municipal Corporation Employees promotion)
सरकारच्या या मार्गदर्शनानंतर महापालिकेने दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून तो विधी समितीच्या माध्यमातून मान्यतेसाठी मुख्य सभेसमोर ठेवला होता. या प्रस्तावाला मुख्य सभेची मान्यता घेतल्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. सरकारने या दुरुस्तीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यामुळे आता प्रशासन अधिकारी, अधीक्षक, उपअधीक्षक, वरिष्ठ लिपिक  यांची पदोन्नती लवकरच होणार हे सिद्ध झाले आहे. (Pune Municipal Corporation News)
—-

पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेने या विषयाचा वारंवार पाठपुरावा केला. त्या पाठपुराव्याला यश आले आहे. यामुळे महापालिकेतील  300 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. याबद्दल आम्ही उपायुक्त सचिन इथापे यांचे आभार व्यक्त करतो.

रुपेश सोनावणे, अध्यक्ष, पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटना 
पदोन्नती बाबतच्या महापालिकेच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे आम्ही आता अधिक्षक, उप अधिक्षक, प्रशासन अधिकारी, वरिष्ठ लिपिक यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया पुन्हा सुरु करणार आहोत.
सचिन इथापे, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग. 
—–
News title |PMC Pune Employees Promotion | The way for the promotion of superintendent, deputy superintendent, administration officer is finally clear! | State Government’s approval of the amendment proposal of the Municipal Corporation