PMC Pune Bharti Exam 2023 | 5 पदांसाठी 3247 उमेदवारांनी दिली परीक्षा!
पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) एकूण 320 पदांसाठी भरती करण्यात (PMC recruitment 2023) येणार आहे. महानगरपालिकेच्या (PMC Pune) आस्थापनेवरील वर्ग 1, वर्ग २ आणि वर्ग ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत. ३२० पदांसाठी महापालिकेकडे 10 हजार 171 अर्ज प्राप्त झाले आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे (PMC Deputy Commissioner Sachin Ithape) यांनी दिलेल्या माहितीनुसार ६ पदांची परीक्षा ही २२ जून ला झाली. तर 5 पदांची परीक्षा ही २ जुलै ला झाली. यामध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर, सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर, व्हेईकल इन्स्पेक्टर, व्हेटर्नरी ऑफिसर आणि फार्मासिस्ट या पदांचा समावेश होता. यासाठी 8 परीक्षा केंद्रावर महापालिकेकडून 41 परीक्षा केंद्र निरीक्षक नियुक्त करण्यात आले होते. 3 शहरात 8 केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. दोन सत्रात ही परीक्षा घेतली. सकाळच्या सत्रात 4008 उमेदवार होते. त्यापैकी 3072 उमेदवारांनी म्हणजे 76% उमेदवारांनी परीक्षा दिली. तर दुपारच्या सत्रात 206 उमेदवार होते. त्यापैकी 175 उमेदवारांनी म्हणजे 85% उमेदवारांनी परीक्षा दिली. (Pune Mahanagarpalika Bharati 2023)
News Title | PMC Pune Bharti Exam 2023 | 3247 candidates appeared for 5 posts!