PMC Pune Bharti 2023 |   9 पदांच्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करण्यासाठीचे वेळापत्रक महापालिकेकडून जाहीर

HomeBreaking Newsपुणे

PMC Pune Bharti 2023 | 9 पदांच्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करण्यासाठीचे वेळापत्रक महापालिकेकडून जाहीर

Ganesh Kumar Mule Jul 22, 2023 5:29 AM

Pune Municipal Corporation | बोपोडीत पुणे महानगरपालिकेची भूसंपादन कारवाई
PMC HRMS Pay Roll and Pension Software | 1 तारखेलाच वेतन देण्याचा महापालिका प्रशासनाचा दावा फोल!
MWRRA | PMC Pune | पुणे महापालिकेला वाढीव जल दराबाबत दिलासा नाही!   | MWRRA कडून महापालिकेची मागणी अमान्य 

PMC Pune Bharti 2023 |   9 पदांच्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करण्यासाठीचे वेळापत्रक महापालिकेकडून जाहीर

PMC Pune Bharti 2023 |  पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) 320 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. परीक्षेचे निकाल घोषित केल्यानंतर महापालिकेकडून पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. नुकतीच फायरमन पदाची कागदपत्र पडताळणीची छाननी पूर्ण झाले.  उर्वरित सर्व पदांच्या कागदपत्र पडताळणीसाठी प्रशासनाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 27 जुलै, 28 जुलै आणि 1 ऑगस्ट या दिवशी पडताळणी केली जाणार आहे. अशी माहिती उपायुक्त सचिन इथापे (Deputy Commissioner Sachin Ithape) यांनी दिली. तसेच संबंधित दिवशी छाननी पूर्ण न झाल्यास दुसऱ्या दिवशी छाननी केली जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी स्वखर्चाने मुक्कामाच्या तयारीने यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनकडून करण्यात आले आहे. (PMC Pune Bharti 2023)
पुणे महानगरपालिकेच्या (PMC Pune) आस्थापनेवरील श्रेणी – १ ते श्रेणी- ३ या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरणेकरीता ०६/०३/२०२३ रोजी जाहिरात देऊन ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. जाहिरातीनुसार प्राप्त अर्जातील महाराष्ट्रातील एकूण ५ शहरांमध्ये वेगवेगळ्या परिक्षा केंद्रावर ऑनलाईन परीक्षा IBPS संस्थे मार्फत घेण्यात आली आहे. IBPS संस्थेकडून पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑनलाईन परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणे कामी संबंधित उमेदवारांची शैक्षणिक व इतर अर्हता / पात्रतेबाबतची मूळ प्रमाणपत्रे / कागदपत्रांची तपासणी करणेकामी छाननी पथक नियुक्त करण्यात आले आहे. (PMC Pune Recruitment 2023)
क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट), वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर / विभागीय आरोग्य निरीक्षक, वाहन निरीक्षक / व्हेईकल इन्स्पेक्टर, औषध निर्माता या पदाच्या उमेदवाराच्या कागदपत्रांची छाननी 27 जुलै ला होणार आहे. जुना जीबी हॉल, डॉ आंबेडकर सभागृह येथे छाननी होईल. आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर पदासाठी 1 ऑगस्ट ला जुना जीबी हॉल मध्ये छाननी होईल. तर उप संचालक (प्राणी संग्रहालय), पशु वैदयकीय अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) या पदांसाठी 28 जुलै ला स्थायी समिती सभागृहात छाननी होईल. (Pune Mahanagarpalika Bharti 2023) 

—-
एका पदास तीन याप्रमाणेच उमेदवारांना बोलवण्यात आलेले असल्यामुळे संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या नवीन यादीत असलेल्या उमेदवारांनीच उपस्थित राहायचे  आहे.
 – सचिन इथापे, उपायुक्त, पुणे महापालिका 
—-
News Title | PMC Pune Bharti 2023 | The schedule for scrutinizing the documents of candidates for 9 posts has been announced by the Municipal Corporation