PMC Property Tax | मिळकत कराच्या वसुलीने ओलांडला 1 हजार कोटींचा टप्पा   | शनिवार आणि रविवार देखील सुविधा केंद्र सुरु राहणार

HomeपुणेBreaking News

PMC Property Tax | मिळकत कराच्या वसुलीने ओलांडला 1 हजार कोटींचा टप्पा | शनिवार आणि रविवार देखील सुविधा केंद्र सुरु राहणार

Ganesh Kumar Mule Jul 27, 2023 2:24 PM

Pune PMC Property Tax | सील केलेल्या 200 व्यावसायिक मिळकतीचा लिलाव करण्याबाबत पुणे महापालिका प्रॉपर्टी टॅक्स विभागाचे नियोजन तयार 
Ajit Deshmukh PMC | उपायुक्त अजित देशमुख यांना एक वर्षाची मुदतवाढ!
PMC WhatsApp ChatBot | Property Tax Bills | पुणे महापालिकेने WhatsApp Chatbot च्या माध्यमातून पाठवली 12 लाख मिळकतकर बिले

PMC Property Tax | मिळकत कराच्या वसुलीने ओलांडला 1 हजार कोटींचा टप्पा

| शनिवार आणि रविवार देखील सुविधा केंद्र सुरु राहणार

PMC Property Tax | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) तिजोरीत मिळकत कराच्या (Pune Property tax) वसुलीतून 1 हजार 77 कोटी रुपये जमा झाले आहेत. 31 जुलै पर्यंत 1200 कोटी जमा होतील, असा अंदाज मिळकत कर विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान करात सवलत मिळवण्याचा कालावधी हा 31 जुलै पर्यंतच असणार आहे. त्यामुळे याचा लाभ घेण्याचे आवाहन मिळकतकर विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच येत्या शनिवार आणि रविवारी सुट्टी असून देखील कर भरणा करण्यासाठी नागरी सुविधा केंद्र सुरु राहणार आहेत. अशी माहिती मिळकतकर विभाग प्रमुख   तथा उपायुक्त अजित देशमुख (Deputy Commissioner Ajit Deshmukh) यांनी दिली. (PMC Property Tax)

देशमुख यांनी पुणेकरांना आवाहन केले आहे कि, पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व मिळकतधारकांना  ३१ जुलै २०२३ पर्यंत आपला संपूर्ण मिळकतकर भरा व सर्वसाधारण करावर ५ किंवा १०% सवलत मिळवा. ३१ जुलै २०२३ पर्यंत आपल्या निवासी, बिगरनिवासी, मोकळ्या जागा यांचा संपूर्ण मिळकतकर

भरल्यास पुणे महानगरपालिकेकडून र.रु. १ कोटीपर्यत बक्षिस असलेली लॉटरी योजना घोषित करण्यात आली आहे. ज्यामध्ये ५ पेट्रोल कार, १५ ई-बाईक, १५ मोबाईल फोन, १० लॅपटॉप अशी एकूण ४५ बक्षिसे मिळकतधारकांना प्राप्त होतील. लॉटरी योजनेचा लाभ घेणेसाठी कुठल्याही प्रकारे अर्ज करण्याची आवश्यकता नाही. केवळ आपला संपूर्ण मिळकतकर दि. ३१ जुलै २०२३ पूर्वी भरणे आवश्यक आहे. (Pune Municipal Corporation News)

देशमुख यांनी पुढे म्हटले आहे कि, नागरिकांच्या सोयीकरिता २९ जुलै व दि. ३० जुलै २०२३ रोजी शनिवार व रविवारी शासकीय सुट्टी सुरु असली तरी देखील महापालिकेची सर्व सी.एफ.सी. केंद्र सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहतील. तसेच दि. ३१ जुलै २०२३ रोजी सर्व सी.एफ.सी. केंद्र सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहतील. आपला संपूर्ण मिळकतकर भरून महापालिकेस सहकार्य करावे. असे ही देशमुख यांनी पुणेकरांना आवाहन केले आहे. (PMC Pune News)
—-
News Title |PMC Property Tax | Income tax collection has crossed the 1 thousand crore mark |The facility will be open on Saturdays and Sundays as well