PMC Property Tax | मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी महापालिकेकडून आजपासून बँड चा वापर सुरु | पहिल्याच दिवशी 1 कोटी 58 लाख वसुली 

HomeपुणेPMC

PMC Property Tax | मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी महापालिकेकडून आजपासून बँड चा वापर सुरु | पहिल्याच दिवशी 1 कोटी 58 लाख वसुली 

गणेश मुळे Feb 26, 2024 3:25 PM

2090 crore collected in the coffers of Pune Municipal Corporation from property tax
Pune Municipal Corporation Tax Due Details | 1 कोटींपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या फक्त 1746 बड्या लोकांनी महापालिकेचे 5182 कोटीं थकवले 
  Income of 18 lakh 74 thousand to the PMC from the auction of commercial property!

PMC Property Tax | मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी महापालिकेकडून आजपासून बँड चा वापर सुरु

| पहिल्याच दिवशी 1 कोटी 58 लाख वसुली

PMC Property Tax | मिळकतकर थकबाकी (Pune Property Tax Due) वसुलीसाठी पुणे महापालिका कर संकलन विभागाच्या (Pune Municipal Corporation Property tax Department) वतीने आजपासून (26 फेब्रु)  बॅन्ड पथक वाजविणेस सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी बँड च्या माध्यमातून 1 कोटी 58 लाखांची वसूली झाली आहे. तर मिळकत करापोटी आजअखेर महापालिकेच्या तिजोरीत 1968 कोटी रुपये जमा झाले आहेत. अशी माहिती कर आकारणी आणि कर संकलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप (Deputy Commissioner Madhav Jagtap) यांनी दिली. (Pune Property tax)

पुणे महानगरपालिकेमधील कर आकारणी व कर संकलन विभाग हा उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता खात्यास देण्यात आलेल्या उद्दिष्ट पूर्ततेच्या अनुषंगाने कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडून थकबाकी वसुली, मिळकत जप्तीची व आकारणी करण्याची तीव्र मोहीम 21 फेब्रुवारी पासून सुरु करण्यात आली आहे. (Pune PMC News)
The karbhari - PMC Property Tax department

24 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत 2956 इतक्या मिळकतींना भेटी देण्यात आल्या.

त्या अनुषंगाने 24 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत 2956 इतक्या मिळकतींना भेटी देण्यात आल्या. अनेक मिळकतधारकांकडून कराची वसुली करण्यात आली आहे. कर न भरल्यामुळे या तीन दिवसात ३० इतक्या मिळकती जप्त करण्यात आल्या आहेत. कारवाई दरम्यान उपरोक्त तीन दिवसात रक्कम ९ कोटी २५ लाख इतका मिळकत कर वसूल करण्यात आला.
थकीत मिळकत कर वसुलीसाठी मिळकतधारकाच्या खात्याकडून आज पासून क्षेत्रीय कार्यलय स्तरावर बॅन्ड पथक वाजविणेची सुरुवात करण्यात आली आहे. 26 फेब्रुवारी रोजी नोटीस वॉरंट बजाविण्यात आलेल्या
मिळकतींची संख्या १२०० इतकी असून, आजचा एका दिवसाचा एकूण भरणा रक्कम 8 कोटी 45 लाख इतका जमा झाला आहे. बॅण्ड पथकाच्या अनुषंगाने 1 कोटी 58 लाख प्राप्त झाले.
थकीत मिळकत कर वसूल करणेबाबत कायद्यातील सर्व बाबींची पूर्तता करून तसेच मिळकतधारकास सर्वोतोपरी संधी देऊनही ज्या मिळकतींचा मिळकत कर वसूल झालेला नाही अशा मिळकतींचा लिलाव करण्यात येणार आहे.

31 मार्च अखेर सर्व सुट्टीच्या दिवशी देखील नागरी सुविधा केंद्र सुरु ठेवून, मिळकतधारकांना कर भरता येईल अशी सुविधा करण्यात आलेली आहे. यासाठी सर्व नागरी सुविधा केंद्रे सर्व शासकीय सुट्टीच्या दिवशी व प्रत्येक शनिवार सकाळी १० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत व रविवार सकाळी १०:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात आली आहेत. तरी, नागरिकांनी याची नोंद घ्यावी. असे आवाहन मिळकतकर विभागाने केले आहे.
नागरी सुविधा केंद्र सुरु राहणार असले तरी, नागरिकांनी जास्तीत जास्त online प्रणालीद्वारे “propertytax.punecorporation.org” या संकेतस्थळावरून मिळकत कर भरणे बाबत आवाहन करण्यात आले आहे.