PMC Property Tax Department | पुणे महापालिका मिळकतकर विभागाचा कारवाईचा धडाका | एकाच दिवशी 8 कोटी 82 लाख थकबाकी असलेल्या 40 मिळकती केल्या सील
PMC Property tax department | पुणे | पुणे महापालिकेच्या (Pune municipal corporation) मिळकतकर विभागाने (PMC Property tax department) थकबाकीदार मिळकत धारकांवर कारवाईचा चांगला धडाका सुरु केला आहे. खासकरून व्यावसायिक मिळकतींवर (Commercial Properties) जोरदार कारवाई सुरु केली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी मिळकतकर विभागाने 8 कोटी 82 लाख थकबाकी असलेल्या 40 व्यावसायिक मिळकती सील केल्या आहेत. तर या कारवाई दरम्यान 1 कोटी 80 लाखांची थकबाकी वसूल केली आहे. अशी माहिती उपायुक्त अजित देशमुख (Ajit Deshmukh) यांनी दिली. (Pune Property tax)
मिळकतकर विभागाने मिळकतकर वसुलीवर चांगला जोर दिला आहे. त्यासाठी विभागाला महापालिका आयुक्तांनी नुकतेच 150 कर्मचारी उपलब्ध करून दिले होते. त्यानुसार विभागाने वसूली आणि थकबाकीदारावर कारवाई करण्याचे काम सुरु केले आहे. व्यावसायिक मिळकतीवर करोडोची थकबाकी आहे. मात्र हे लोक टॅक्स जमा करत नाहीत. त्यामुळे महापालिकेने व्यावसायिक मिळकती सील करण्याचा धडाका सुरु ठेवला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी मिळकतकर विभागाने 8 कोटी 82 लाख थकबाकी असलेल्या 40 व्यावसायिक मिळकती सील केल्या आहेत. तर या कारवाई दरम्यान 1 कोटी 80 लाखांची थकबाकी वसूल केली आहे. (Pune Municipal corporation)
उपायुक्त अजित देशमुख यांनी सांगितले कि, आज एकूण 217 मिळकतींना भेट दिली. त्यातील 80 मिळकतींना नोटिसा देण्यात आल्या. यातील 40 मिळकती सील केल्या. देशमुख यांनी सांगितले कि आजपर्यंत 2004 मिळकती सील केल्या आहेत. यांची थकबाकी ची रक्कम 123 कोटी इतकी आहे.
दरम्यान महापालिकेने 200 व्यावसायिक मिळकतीची लिलाव प्रक्रिया देखील सुरु केली आहे. यातून महापालिकेला 60 कोटी उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे.