PMC Property Tax Abhay Yojana | अभय योजनेतून महापालिकेच्या मिळकतकर विभागाला ९५४ कोटींचा महसूल | आर्थिक वर्षात मिळाले २८६०  कोटी

Homeadministrative

PMC Property Tax Abhay Yojana | अभय योजनेतून महापालिकेच्या मिळकतकर विभागाला ९५४ कोटींचा महसूल | आर्थिक वर्षात मिळाले २८६०  कोटी

Ganesh Kumar Mule Mar 16, 2026 6:30 PM

Maternal Health | माता आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्राला दोन राष्ट्रीय पुरस्कार |आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्वांचे अभिनंदन
Barsu Refinery | रत्नागिरीतील बारसू रिफायनरीविरोधातील आंदोलकांवरील मुस्कटदाबीचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून निषेध
PMRDA |  UDCPR | जोपर्यंत पीएमआरडीए ला UDCPR लागू होत नाही तोपर्यंत केसेस पूर्णतः ऑफलाईन पद्धतीने कराव्यात |  नागरी हक्क संस्थेची सरकार कडे मागणी 

PMC Property Tax Abhay Yojana | अभय योजनेतून महापालिकेच्या मिळकतकर विभागाला ९५४ कोटींचा महसूल | आर्थिक वर्षात मिळाले २८६०  कोटी

 

Pune Property tax – (The Karbhari News Service) – महापालिकेच्या अभय योजना कालावधीच्या  इतिहासात प्रथमच उच्चांकी ९५४ कोटी रुपयांची विक्रमी वसुली महापालिका मिळकत कर विभागाने केली आहे. दरम्यान चालू आर्थिक वर्षात विभागाला २८६० कोटी महसूल मिळाला आहे. मागील वर्षीपेक्षा हे उत्पन्न ७०० कोटींनी अधिक आहे. अशी माहिती उपायुक्त रवी पवार यांनी दिली. (PMC Property Tax Department)

पुणे महानगरपालिका हद्दीत निवासी, बिगरनिवासी व मोकळ्या जागांची वर्षानुवर्षे मिळकत कर न भरल्याने थकबाकी असलेल्या मिळकतींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच थकबाकी असलेल्या मिळकतींवर दरमहा आकारण्यात येणाऱ्या मिळकतींना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, प्रकरण ८ नियम ४१ अन्वये २% शास्ती आकारण्याची तरतूद आहे. त्यामुळे मिळकतकराची थकबाकी मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे.

नागरीकांची वाढती थकबाकी आणि मागणी पाहता महापालिका आयुक्त यांनी पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व प्रकारच्या मिळकतकर थकबाकी असणा-या मिळकतदारांसाठी शास्ती /दंडाच्या रक्कमेवर ७५% सूट देणेकामी १५ नोव्हेंबर २०२५ ते १५ मार्च २०२६ अखेर “अभय योजना” जाहिर केली होती. अभय योजने अंतर्गत जास्तीत जास्त मिळकतकर जमा होण्यासाठी कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत विशेष प्रयत्न करून उत्पन्न वाढीवर लक्ष केंद्रीत केले होते.

१५ नोव्हेंबर ते १५ मार्च या कालावधीत १ लाख ६४ हजार ६६५ मिळकत कर धारकांनी अभय योजनेचा लाभ घेतला. त्यातून महापालिकेला ९५४ कोटी उत्पन्न मिळाले. तर याच कालावधीत १९३२१ लोकांनी अभय योजनेचा लाभ न घेता ११५ कोटी जमा केलें आहेत. १५ नोव्हेंबर ते १५ मार्च या कालावधीत १ लाख ८३ हजार ९८६ लोकांनी कर भरत १०७० कोटी जमा केले आहेत.

दरम्यान चालू आर्थिक वर्षात १५ मार्च अखेर एकूण २८६० कोटी मनपा तिजोरीत जमा झाले आहेत. गत वर्षी याच कालावधीत  २१५९ कोटी जमा झाले होते. म्हणजे ८०० कोटी अधिक उत्पन्न यावर्षी मिळाले आहे. असे रवी पवार यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: