PMC Pension | पेन्शन प्रकरणे प्रलंबित ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस नंतर आता अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून शास्तीची कारवाई

Homeadministrative

PMC Pension | पेन्शन प्रकरणे प्रलंबित ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस नंतर आता अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून शास्तीची कारवाई

Ganesh Kumar Mule Apr 02, 2025 9:21 PM

PMC Additional Commissioner | अतिरिक्त महापालिका आयुक्त यांच्याकडील कामकाज व्यवस्थेत बदल!
PMC Employees Promotion | अखेर उप अधीक्षक पदावरील कर्मचाऱ्यांना अधीक्षक पदी मिळाली पदोन्नती! | The कारभारी च्या बातमीचा परिणाम! 
AI Training in PMC | पुणे महानगरपालिकेत Ai प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

PMC Pension | पेन्शन प्रकरणे प्रलंबित ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस नंतर आता अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून शास्तीची कारवाई

| काम नाही केले तर आता वेतनवाढ रोखली जाणार किंवा निलंबन कारवाई होणार

 

PMC Retirement – (The Karbhari News Service) – महापालिका अधिकारी आणि कर्मचारी हे सेवानिवृत्त सेवकांची पेन्शन सुरू करण्यात उदासीन असल्याचे दिसून येत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने गंभीरपणे लक्ष दिले होते. ५ पेक्षा अधिक पेन्शन प्रकरणे प्रलंबित ठेवणाऱ्या बिल क्लार्क यांना कारणे दाखवा नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. त्यानुसार या कर्मचाऱ्यांनी खुलासे सादर केले होते. मात्र हे खुलासे असमाधानकारक असल्याने अतिरिक्त आयुक्तांनी शास्तीची कारवाई करत या कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

सेवानिवृत्त सेवकांची पेन्शन प्रकरणे प्रलंबित राहत आहेत. याचा फटका सेवानिवृत्त झालेल्या सेवकांना सहन करावा लागतो. कारण निवृत्त झाल्यानंतर त्यांचे वेतन बंद होते. त्यांना त्यांचे कुटुंब चालवण्यासाठी पेन्शनची आवश्यकता असते. मात्र काही कर्मचारी आणि अधिकारी या कामात हलगर्जीपणा करतात, याचा परिणाम सेवानिवृत्त झालेल्या सेवकांना भोगावा लागतो. यामुळे ही बाब महापालिका अतिरिक्त आयुक्त यांनी गंभीरपणे घेतली आहे. ५ पेक्षा अधिक प्रकरणे प्रलंबित ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. याचा रीतसर खुलासा करण्याचे आदेश दिले होते. एकूण ३८ कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आल्या होत्या.

त्यानुसार या कर्मचाऱ्यांनी आपले खुलासे सादर केले होते. मात्र यातील १७ कर्मचाऱ्यांचे खुलासे असमाधानकारक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रेन यांनी या कर्मचाऱ्यांवर शास्ती ची कारवाई केली आहे. अतिरिक्त आयुक्त यांनी या कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे. यापुढे प्रकरण प्रलंबित असेल तर या प्रकरणी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखली जाणार किंवा त्यांच्यावर निलंबन कारवाई केली जाईल. तसेच दंडात्मक कारवाई देखील केली जाईल. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
—-

सेवानिवृत्त सेवकांचे पेन्शन प्रकरणे सत्वर निकाली काढणे, ही जबाबदारी संबंधित बिल लेखनिक आणि त्या खात्याची आहे. मात्र सेवानिवृत्त प्रकरणे सत्वर निकाली काढण्यात काही सेवक उदासीन दिसून येतात. त्यामुळे अशा सेवका विरुद्ध प्रशासकीय कारवाई करणे आवश्यक ठरते. जेणेकरून पेन्शन प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी प्रयत्न होतील. त्याचा फायदा सर्व सेवानिवृत्त सेवकांना होईल. यामध्ये पेन्शन विभाग आणि मुख्य लेखा परीक्षक विभाग यांचे ही सहकार्य असणे आवश्यक आहे.

नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी.