PMC Medical College News | मेडिकल कॉलेज प्रवेश घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा
| सजग नागरिक मंचाची राज्य सरकारकडे मागणी
PMC Medical College News | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) अटलबिहारी वाजपेयी महाविद्यालयातील (Atal Bihari Vajpeyi Medical College) वैद्यकीय प्रवेश घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी सजग नागरिक मंचाकडून (Sajag Nagrik Manch) राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे. (PMC Medical College News)
याबाबत मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar) यांनी सांगितले कि, पुणे महापालिकेच्या अटलबिहारी वाजपेयी रुग्णालयातील डीन ना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हाथ पकडले. या महाविद्यालयातील प्रथम वर्ष प्रवेशातील संस्था स्तरावर दिल्या जाणाऱ्या १५ जागांवरील प्रवेशादरम्यान पालकांकडून फी व्यतिरिक्त लाखो रुपये लाच घेतल्याप्रकरणी ही कारवाई झाली. या महाविद्यालयावर एक ट्रस्टी बोर्ड आहे ज्यावर पुणे महापालिका आयुक्त, पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त तसेच आरोग्य प्रमुख आणि डीन असे चौघेजण आहेत. डीन ना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हाथ पकडले आहे. त्यामुळे या प्रकारात उर्वरीत तीन सदस्य संगनमताने सामील आहेत का याची तसेच या वर्षीच्या आणि गेल्या वर्षीच्या संस्था स्तरावरील १५ जागांवरील प्रवेश प्रक्रियेची उच्च स्तरीय चौकशी झाली पाहिजे. तसेच या भ्रष्टाचाराचं मूळ असलेल्या संस्था स्तरीय १५ जागांचा प्रवेश बंद करुन शासकीय मेडीकल महाविद्यालयातील प्रवेशा प्रमाणे १००% प्रवेश पूर्णपणे मेरीट वर आणि सेंट्रलाईज्ड पद्धतीने झाले पाहिजेत अशी आमची आग्रहाची मागणी आहे. असे वेलणकर यांनी सांगितले. (Pune Municipal Corporation News)
——–
News Title | PMC Medical College News | High level probe into medical college admission scam| Sajag Nagarik Mancha’s demand to the state government