PMC Medical College | महापालिकेच्या मेडिकल कॉलेज मध्ये उभा केला जाणार अटल बिहारी वाजपेयी यांचा अर्धपुतळा!
| केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची संस्था करणार खर्च
Atal Bihari Vajpeyi – (The Karbhari News Service) – जुने नायडू हॉस्पिटल, पुणे (PMC Dr Nayadu Hospital) येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय (PMC Medical College) आवारामध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी (Bharatratna Atal Bihari Vajpeyi) यांचा ब्राँझ धातुचा ३ फूट उंचीचा अर्धपुतळा उभारणेत येणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांची संस्था याचा खर्च करणार आहे. या बाबतचा शहर सुधारणा समिती (PMC CIC) समोर ठेवण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
समितीच्या प्रस्तावानुसार भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे काम करणे व सभोवतालचा परिसर विकसित करणे या कामी भवन रचना विभागामार्फत निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून याचे काम प्रगतीपथावर आहे. या ठिकाणी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा ब्राँझ धातुचा ३ फूट उंचीचा अर्धपुतळा संस्कृती सामाजिक संस्थेमार्फत स्वखर्चाने तयार करून पुणे महानगरपालिकेस सुपूर्त करण्याचा आमचा मानस आहे. असे मोहोळ यांनी महापालिकेला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
जुने नायडू हॉस्पिटल, पुणे येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारामध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा अर्धपुतळा उभारणेकरिता मुख्य सभा यांची मान्यता घेणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या पुतळा समितीची अर्धपुतळा उभारणेस मान्यता घेणेसाठी मुख्य सभेचा ठराव करणे आवश्यक आहे. तसेच विषयांकित ठिकाणी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा अर्धपुतळा उभारणे या कामी आवश्यक त्या सर्व खात्याचे अभिप्राय प्राप्त करून घेण्यात येत आहेत. तद्नंतर संपूर्ण प्रस्ताव आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह पुतळा समितीकडे मान्यतेस्तव सादर करण्यात येणार आहे. या प्रस्तावावर आजच्या समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.
COMMENTS