PMC Labour Welfare Department | कामगार कल्याण विभाग अतिरिक्त आयुक्त (जनरल) यांच्या अधिनस्त! | महापालिका आयुक्त यांनी जारी केले आदेश
Naval Kishore Ram IAS – (The Karbhari News Service) – महापालिकेचा कामगार कल्याण विभाग हा अतिरिक्त आयुक्त (जनरल) यांच्याच अखत्यारीत असणार आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)
अतिरिक्त आयुक्त यांच्या अखत्यारीतील विभाग बाबत महापालिका आयुक्त यांनी आदेश जारी केले होते, त्यानुसार कामगार कल्याण विभाग हा अतिरिक्त आयुक्त (विशेष) यांच्याकडे सोपवण्यात आला होता. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात होते. कारण कामगार कल्याण विभाग हा आजपर्यंत अतिरिक्त आयुक्त (जनरल) यांच्या अधिनस्त राहिला आहे. कारण सर्व प्रशासकीय कामकाज हे अतिरिक्त आयुक्त (जनरल) यांच्या अधिनस्त ठेवले जाते. मात्र कामगार कल्याण विभाग इतरत्र सोपवल्याने भुवया उंचावल्या होत्या. मात्र आयुक्तांनी यात बदल करत पुन्हा हा विभाग अतिरिक्त आयुक्त (विशेष) यांच्याकडून काढून घेत अतिरिक्त आयुक्त (जनरल) यांच्या अधिनस्त ठेवला आहे.

COMMENTS