PMC Labour Welfare Department | पुणे महापलिका कर्मचाऱ्यांच्या पाल्याकडून मागवले अर्ज! 

Homeadministrative

PMC Labour Welfare Department | पुणे महापलिका कर्मचाऱ्यांच्या पाल्याकडून मागवले अर्ज! 

Ganesh Kumar Mule Jul 22, 2025 8:03 PM

अक्षय तृतीयेच्या दिवशी सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरु ठेवण्याचे नोंदणी महानिरीक्षक यांचे आदेश
Vidhansabha Election 2024 | शरद पवारांची विधानसभा निवडणुकीत आघाडी | पुणे शहरातील सर्व इच्छुकांचे अर्ज मागवले
Maharashtra set up committee for farmers | Telangana Model | शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

PMC Labour Welfare Department | पुणे महापलिका कर्मचाऱ्यांच्या पाल्याकडून मागवले अर्ज!

 

PMC Employees and Officers – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) अधिकारी / सेवकांच्या पाल्यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक (इयत्ता दहावी व बारावी) परीक्षांमध्ये उत्तम यश प्राप्त केले आहे. अशा उत्तीर्ण सर्व पाल्यांचे महापालिकेच्या कामगार कल्याण निधीतर्फे (PMC Labour Welfare Fund)  सन्मान केला जातो. त्यानुसार पाल्याकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. (PMC Labour Welfare Department)

माध्यमिक व उच्च माध्यमिक (इयत्ता १० वी, १२ वी) परीक्षांमध्ये ६५% गुणांपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या सर्व पाल्यांचा कामगार कल्याण निधीमार्फत गुणगौरव व सत्कार समारंभ प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यानुसार कामगार कल्याण निधीच्या ज्या सभासद सेवकांच्या पाल्यांनी ६५% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविले आहेत, अशा पाल्यांचा सन्मान केला जातो. यात पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून सामग्री दिली जाते. दरम्यान यासाठी अर्ज करण्यासाठी कालावधी ११ ऑगस्ट पर्यंत देण्यात आला आहे. अर्ज सोबत गुणपत्रिका आणि कर्मचाऱ्याची एप्रिल पेड इन मे ची वेतन चिट्ठी जोडायची आहे. असे आदेश अतिरिक्त आयुक्त एम जे पी चंद्रन यांनी जारी केले आहेत.  (Pune Municipal Corporation – PMC)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: