PMC Junior Engineer Recruitment 2025 | २७८७९ उमेदवारांना त्यांचा सामाजिक किंवा समांतर आरक्षणाचा प्रवर्ग बदलण्यासाठी संधी | ३० ऑगस्ट पर्यंत करू शकता अर्ज
PMC Junior Engineer Recruitment – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिके कडून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ मधील रिक्त पदे सरळसेवेने भरणेसाठी ९ जानेवारी २०२४ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र या प्रक्रिये मराठा आरक्षणचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाने सरकारकडे मार्गदर्शन मागवले होते. याबाबत सरकार कडून मार्गदर्शन प्राप्त झाले आहे. त्यानुसार सरकारने सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार १६९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
दरम्यान या आधी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते, अशा २७८७९ उमेदवारांपैकी वय मर्यादा उलटून गेलेल्या उमेदवारांना देखील अर्ज करण्यास मुभा देण्याचे निर्देश राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत. त्यामुळे या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. कारण या सर्व उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत. शिवाय या सर्व उमेदवारांना त्यांच्या जातीचा प्रवर्ग सुधारित करण्याची देखील संधी देण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेकडून जाहीर प्रकटन देण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
त्यानुसार पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ या पदाची रिक्त असणारी पदे सरळसेवेने भरण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात करिता २७/०२/२०२४ रोजीच्या शासन निर्णयाने लागू केलेले सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरिता (एसईबीसी) चे १०% आरक्षण सुनिश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुषंगाने सदर पदाच्या भरतीसाठी वाढीव जागांसह सुधारित सामाजिक व समांतर आरक्षण दर्शविण्यात आलेले आहे. याबाबत नव्याने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अलाहिदा संधी देण्यात येणार आहे. सद्यःस्थितीत ०९/०१/२०२४ रोजीच्या जाहिरातीनुसार उमेदवारांनी यापूर्वीच सादर केलेले अर्ज गृहीत धरण्यात आलेले असल्याने त्यांनी नव्याने पुनश्चः अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही. तथापि, ०९/०१/२०२४ च्या जाहिरातीमध्ये उपलब्ध नसलेल्या सामाजिक व समांतर आरक्षणाच्या काही जागा नव्याने उपलब्ध झाल्याने त्याप्रमाणे संबंधित उमेदवारांना त्यांचा सामाजिक किंवा समांतर आरक्षणाचा प्रवर्ग बदलण्यासाठी संधी देण्यात येत आहे.
त्याकरिता संबंधित उमेदवारांनी आपले अर्ज सुधारित करण्यासाठी या लिंकवर https://ibpsonline.ibps.in/pmcjul23 १३ पासून ते ३० ऑगस्ट रोजीचे २३:५९ वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावा.
अधिकची सविस्तर माहिती https://www.pmc.gov.in/l/recruitment या ठिकाणी उपलब्ध असून त्याचे अवलोकन करण्यात यावे. असे अतिरिक्त महापालिका आयुक्त यांनी म्हटले आहे.
-
५ सप्टेंबर च्या दरम्यान नवीन जाहिरात
पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation (PMC) तिसऱ्या टप्प्यातील भरती (PMC Recruitment 2024) प्रक्रिया सुरु केली होती. 113 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. याआधी पहिल्या टप्प्यात 448 तर दुसऱ्या टप्प्यात 320 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. महापालिकेने तिसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या पदांमध्ये कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) (स्थापत्य), यांचा समावेश आहे. १६९ पदासाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. सुरुवातीला महापालिका उमेदवारांना त्यांचा सामाजिक किंवा समांतर आरक्षणाचा प्रवर्ग बदलण्यासाठी संधी देणार आहे. त्यानंतर नवीन उमेदवारांना अर्ज करण्यासाठी जाहिरात देण्यात येणार आहे. ही जाहिरात ५ सप्टेंबर च्या दरम्यान येऊ शकते. तसेच अर्ज करण्यासाठी २० सप्टेंबर ची मुदत दिली जाऊ शकते. तर परीक्षा ही १५ ऑक्टोबर पर्यंत घेतली जाऊ शकते. अशी माहिती उपायुक्त प्रसाद काटकर यांनी दिली.


COMMENTS