PMC Junior Engineer Promotion | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या पदोन्नतीसाठी महापालिका प्रशासनाकडून 28 जानेवारीला परीक्षा!

HomeBreaking Newsपुणे

PMC Junior Engineer Promotion | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या पदोन्नतीसाठी महापालिका प्रशासनाकडून 28 जानेवारीला परीक्षा!

कारभारी वृत्तसेवा Dec 20, 2023 4:08 PM

MPSC Exam Result | राज्य सेवा (पूर्व) परीक्षा – २०२२ चा निकाल जाहीर ; | मुख्य परीक्षा २१,२२ व २३ जानेवारी, २०२३ रोजी
Integrated Tribal Development Project, Kalawan | विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे | विशाल नरवाडे 
Teacher Recruitment | शिक्षक भरतीसाठी राज्य सरकार कडून अर्ज मागवले

PMC Junior Engineer Promotion | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या पदोन्नतीसाठी महापालिका प्रशासनाकडून 28 जानेवारीला परीक्षा!

| वर्ग 3 आणि 4 मधून कर्मचारी होणार JE

PMC Junior Engineer Promotion | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) आस्थापनेवरील कार्यरत वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांमधून (Class 3 and 4) अभियांत्रिकी संवर्गात (Engineering Cadre) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (Junior Engineer (Civil)) या पदावर पदोन्नती (Promotion) देण्यात येणार आहे. त्यासाठी नवीन नियमानुसार कर्मचाऱ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. महापालिका प्रशासनाने त्याची तयारी केली असून 28 जानेवारी 2024 ही परीक्षा (Exam) होणार आहे. यासाठी पूर्वीच मागवलेल्या अर्जांमधून पात्र ठरलेल्या 60 कर्मचाऱ्यांची परीक्षा होणार आहे. यात पात्र होण्यासाठी 45% गुण मिळवावे लागणार आहेत. दरम्यान या परीक्षेची पूर्वीच धास्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना मात्र आता खूप अभ्यास करावा लागणार आहे. (PMC Pune)
पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता (Executive Engineer) , उप अभियंता (Deputy Engineer) तसेच कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) या पदांच्या नेमणुकीची पद्धत, टक्केवारी आणि अर्हता बदलण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्याकडून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. याला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार आता कनिष्ठ अभियंता यांना 25% च्या ऐवजी 15% पदोन्नती ठेवण्यात आली आहे. त्या पदोन्नती साठी आता कर्मचाऱ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. तर 75% च्या ऐवजी 85% सरळसेवा भरती करण्यात येणार आहे. (Pune Municipal Corporation)
सरकारकडून प्रस्ताव मान्य होऊन आल्याबरोबर प्रशासनाने तात्काळ परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. मात्र यात नवीन कुठले अर्ज न मागवता या आधीच पात्रता धारण केलेल्या उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. वर्ग 3 आणि 4 मधील हे 60 कर्मचारी आहेत. जेंव्हा २५% पदोन्नतीचा नियम होता तेव्हा अर्ज मागवले होते. मात्र आता फक्त १५ टक्केच जागा आहेत. त्यानुसार अर्ज का मागवले नाहीत याबाबत प्रशासनाकडून सांगण्यात आले कि हा निर्णय प्रशासन घेऊ शकते. त्यात आधीच पदोन्नती देण्यात उशीर झाला आहे. नवीन अर्ज मागवले तर अजून प्रक्रिया लांबेल. त्यामुळे पहिल्याच कर्मचाऱ्यांना संधी दिली जाणार आहे. दरम्यान या पदोन्नती बाबत महापालिका प्रशासनाकडून 2021 पासूनच तयारी सुरु केली होती. मात्र काही उमेदवारांनीच यात खोडा घातल्याने ही पदोन्नती लांबत गेली. परराज्यातून पदवी आणणाऱ्या लोकांबाबत देखील आक्षेप घेतले गेले होते. त्यातच महापालिका प्रशासनाने पदोन्नती देताना सेवाज्येष्ठतेचा विचार न करता परीक्षा घेण्याची भूमिका घेतली आणि प्रस्ताव सरकारकडे पाठवला. सरकारने दुरुस्ती करून नवीन प्रस्ताव पाठवला आहे. त्यानुसार नवीन नियमाचा आधार घेऊन आता ही परीक्षा घेतली जाणार आहे.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदावर पदोन्नती देण्यासाठी 5 वर्षाचा अनुभव आणि स्थापत्य ची पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे. त्यानुसार 28 जानेवारीला ही परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा इंग्रजी माध्यमातून वस्तुनिष्ठ पद्धतीने घेण्यात येणार आहे. 100 गुणाची प्रश्नपत्रिका असणार आहे. यात उत्तीर्ण होण्यासाठी 45% गुण मिळणे आवश्यक आहे. ही परीक्षा IBPS संस्था घेणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना 7 दिवसाचा अवधी देण्यात आला आहे. १५% पदोन्नती नुसार आता ४० च्या आसपास जागा रिक्त आहेत. तेवढ्याच लोकांना संधी मिळणार आहे. उर्वरित लोकांना पदोन्नंती मिळवण्यासाठी नंतर परीक्षा द्यावी लागणार आहे.
खरे पाहता काही उमेदवारांनाच पाहिल्यापासूनच अशी परीक्षा घेण्याला विरोध होता. त्यांची मात्र चांगलीच गोची होणार आहे. कारण आता राज्य सरकारनेच तसे आदेश दिले आहेत. आता आक्षेप देखील घेता येणार नाही. त्यामुळे चांगला अभ्यास करण्याशिवाय आता पर्याय नाही, हे स्पष्ट होत आहे.
—-