PMC HRA Circular | पुणे महापालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांना सुधारित दराने घरभाडे भत्ता देण्याबाबत परिपत्रक जारी! 

Homeadministrative

PMC HRA Circular | पुणे महापालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांना सुधारित दराने घरभाडे भत्ता देण्याबाबत परिपत्रक जारी! 

Ganesh Kumar Mule Jan 07, 2025 9:00 PM

7th pay commission : HOD : Pay Matrix S27 : खाते प्रमुखांच्या वेतन वाढीचा प्रस्ताव सरकारला सादर  : पे मॅट्रिक्स एस 27 ची केली मागणी 
7th pay commission : DA : PMC : सुधारित महागाई भत्ता जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतनात मिळणार! 
7th Pay Commission 5th Installment  | पुणे महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | 7 व्या वेतन आयोगाच्या पाचव्या हफ्त्याची रक्कम देण्याबाबत सर्क्युलर जारी!

PMC HRA Circular | पुणे महापालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांना सुधारित दराने घरभाडे भत्ता देण्याबाबत परिपत्रक जारी!

 

7th Pay Commission Latest News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation – PMC) कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्या प्रमाणे महागाई भत्ता (DA) लागू करण्याचे धोरण आहे. त्यानुसार सुधारित दराने घरभाडे भत्ता (HRA) देखील दिला जातो. महागाई भत्ता आधीच लागू करण्यात आला आहे.  आता घरभाडे भत्ता सुधारित दराने देण्याबाबत मुख्य वित्त व लेखा अधिकारी उल्का कळसकर (Ulka Kalaskar PMC) यांनी परिपत्रक जारी केले आहे. (PMC Employees)

शासन निर्णयानुसार पुणे शहराचा एक्स वर्गीकृत शहरामध्ये समावेश केलेला आहे. पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना उपरोक्त १ जानेवारी  पासून ७ वा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे.  ७ व्या वेतन आयोगानुसार अनुज्ञेय केलेला महागाई भत्ता ५० टक्कयाची मर्यादा ओलांडेल त्यावेळी एक्स शहरासाठी ३० टक्के घरभाडे भत्ता  मंजूर करण्यात यावा असे निर्देश आहेत.

पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचान्यांप्रमाणे महागाई भत्ता लागू करण्याचे धोरण आहे. त्यानुसार  पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना दिनांक १ जुलै २०२४ पासून ५० टक्के वरून ५३ टक्के महागाई भत्ता वाढविण्यात आला आहे. त्यानुसार माहे जुलै २०२४ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार घरभाडे भत्ता सुधारीत दराने २७% वरून ३०% या दराने लागू करणेस व जानेवारी २०२५ पेड इन फेब्रुवारी २०२५ चे वेतनातून फरकासह अदा करणेबाबत  महापालिका आयुक्त यांची मान्यता मिळालेली आहे.

परिपत्रकानुसार पुणे महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी, प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षकेत्तर कर्मचारी व माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच तंत्र शाळांकडील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना माहे जुलै २०२४ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार घरभाडे भत्ता सुधारीत दराने २७% वरून ३०% या दराने लागू करणेस व जानेवारी २०२५ पेड इन फेब्रुवारी २०२५ चे वेतनातून फरकासह अदा केला जाणार आहे.

जुलै २०२४ ते माहे डिसेंबर २०२४ या सहा महिन्याचा ७ व्या वेतन आयोगानुसार घरभाडे भत्ता सुधारीत दराने २७% वरून ३०% फरकासह माहे जानेवारी २०२५ पेड
इन फेब्रुवारी २०२५ चे वेतनातून अदा केला जाणार आहे.

तसेच जुलै २०२४ ते माहे जानेवारी २०२५ या कालावधीतील सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी सेवकांना, मयत सेवकांना माहे जुलै २०२४ ते माहे जानेवारी २०२५ या कालावधीतील ७ व्या आयोगानुसार घरभाडे भत्ता सुधारीत दराने २७% वरून ३०% फरक सदर सेवक ज्या खात्यातून सेवानिवृत्त झालेले आहेत अथवा होतील त्या खात्याकडून अदा करणेची कार्यवाही केली जाणार आहे.
—-

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0