PMC Health Department | मोठ्या इस्पितळातील मोफत उपचारांपासून गरीब व गरजू रुग्णांना महापालिका आरोग्य विभागच वंचित ठेवतोय | विवेक वेलणकर यांचा आरोप 

Homeadministrative

PMC Health Department | मोठ्या इस्पितळातील मोफत उपचारांपासून गरीब व गरजू रुग्णांना महापालिका आरोग्य विभागच वंचित ठेवतोय | विवेक वेलणकर यांचा आरोप 

Ganesh Kumar Mule Jun 17, 2025 8:19 PM

 Pune Sex Ratio |  Only 890 girls for every 1 thousand boys in Savitribai’ Phules Pune!
PMC Health Department | किटकजन्य आजारांचा विळखा सैल! | पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला यश 
PMC Rajiv Gandhi Hospital | महापालिकेच्या येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात लवकरच सुरु होणार ऑक्सिजन प्लांट

PMC Health Department | मोठ्या इस्पितळातील मोफत उपचारांपासून गरीब व गरजू रुग्णांना महापालिका आरोग्य विभागच वंचित ठेवतोय | विवेक वेलणकर यांचा आरोप

 

Vivek Velankar Pune – (The Karbhari News Service) – मोठ्या इस्पितळातील मोफत उपचारांपासून गरीब व गरजू रुग्णांना पुणे महापालिका आरोग्य विभागच वंचित ठेवतोय, असा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे. तसेच हाॅस्पिटल मधील सर्व मोफत बेडस वापरले जावेत यासाठी सक्षम यंत्रणा उभी करावी तसेच या योजनेमध्ये जास्तीत जास्त गरजू रुग्णांना लाभ मिळणे आवश्यक असल्याने यासंदर्भातील उत्पन्न मर्यादा तीन लाख रुपये करण्यात यावी. अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.  (Pune Municipal Corporation Health Department)

वेलणकर यांनी महापालिका आयुक्त यांना दिलेल्या पत्रानुसार  पुण्यातील रुबी इस्पितळ, सह्याद्री हाॅस्पिटल कर्वे रोड, के के आय इन्स्टिट्यूट अश्या मोठ्या इस्पितळांना पुणे मनपा ने ०. ५० जादा FSI दिला आहे व त्यापोटी या मोठ्या इस्पितळात रोज १९ बेड ( रूबी हाॅल १२, सह्याद्री ५ तर के के आय इन्स्टिट्यूट येथे २ ) मनपाने सिफारिश केलेल्या रुग्णांना मोफत उपलब्ध आहेत. याचाच अर्थ दरवर्षी ६९३५ गरीब व गरजू रुग्णांना या मोठ्या इस्पितळात मोफत उपचार मिळू शकतात.

मात्र रुबी हॉल येथे २०२२ – २३ , २०२३-२४ , २०२४-२५ या तीन वर्षात मिळून ७२ तर यावर्षीच्या पहिल्या दोन महिन्यांत मिळून ८ रुग्णांना तर सह्याद्री हाॅस्पिटल येथे २०२२ – २३ , २०२३-२४, २०२४-२५ या तीन वर्षात मिळून ७९ तर यावर्षीच्या पहिल्या दोन महिन्यांत मिळून ३ रुग्णांना तर के के आय इन्स्टिट्यूट येथे २०२२ – २३, २०२३-२४, २०२४-२५ या तीन वर्षात मिळून ७५ तर यावर्षीच्या पहिल्या दोन महिन्यांत ६ रुग्णांना या सवलतीचा लाभ मिळाला असे मला माहिती अधिकारात कळवण्यात आले आहे. याचे कारण एक तर नागरिकांना या योजनेची माहितीच नाही ( आणि ती आरोग्य विभाग पोचवतही नाही) किंवा पुणे शहर देशातील पहिली स्मार्ट सिटी बनली असल्याने इथे गरीब व गरजू रुग्ण उरलेच नसावेत. मुळातच गरीब व गरजू रुग्ण म्हणजे फक्त दारिद्र्य रेषेखालील ( वार्षिक उत्पन्न ५० हजारांचे खाली ) ही व्याख्या या केसमध्ये विनाकारण मनपा अधिकार्यांनी केल्याचा हा परीणाम आहे . वार्षिक तीन लाख उत्पन्न मिळवणारे ही गरीब व गरजू असतात आणि मोफत उपचारांसाठी उपलब्ध बेडस वाया घालवण्यापेक्षा त्यांना उपलब्ध करून देण्यात आले तर अनेक गरजूंना फायदा होईल. असे वेलणकर यांनी म्हटले आहे.

याशिवाय औंध इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ( एम्स) रूग्णालयातील १० % बेडस (१० बेडस) महापालिका पाठवेल त्या रुग्णांना मोफत उपचारांसाठी राखीव ठेवण्याचा करार २०१३ मध्ये करण्यात आला , मात्र २०२२ – २३, २०२३-२४ , २०२४-२५ या तीन वर्षात मिळून ३३ तर यावर्षीच्या पहिल्या तीन महिन्यांत ३ रुग्णांना या सवलतीचा लाभ मिळाला. त्यामुळे हे रोजचे दहा बेडसपासून गरजू व गरीब रूग्ण वंचितच रहात आहेत.

—-

आमची आग्रहाची मागणी की या प्रकरणाची चौकशी करून गरीब व गरजू रुग्णांसाठी ३६५ दिवस या चारही हाॅस्पिटल मधील सर्व मोफत बेडस वापरले जावेत, यासाठी सक्षम यंत्रणा उभी करावी. तसेच या योजनेमध्ये जास्तीत जास्त गरजू रुग्णांना लाभ मिळणे आवश्यक असल्याने यासंदर्भातील उत्पन्न मर्यादा तीन लाख रुपये करण्यात यावी.

 

—— विवेक वेलणकर , अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे