PMC Good Governance Day | पुणे महानगरपालिकेतर्फे सुशासन सप्ताहानिमित्त परिसंवादाचे आयोजन

Homeadministrative

PMC Good Governance Day | पुणे महानगरपालिकेतर्फे सुशासन सप्ताहानिमित्त परिसंवादाचे आयोजन

Ganesh Kumar Mule Dec 24, 2024 11:43 AM

Plastic Free Society | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर वेंडिंग मशीनमधून फक्त १० रुपयांत पर्यावरणपूरक कापडी पिशवी | पंकजा मुंडे यांच्या हस्ते कापडी पिशवी वेंडिंग मशीनचे उद्घाटन
MLA Sunil Tingare | वडगाव शेरी, धानोरी भागातील पूरग्रस्तांचे सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई देणार | आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर मंत्री सामंत यांचे आश्वासन
PMPML | पीएमपीएमएल बसेस मधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 300 ऐवजी 500 रुपयाचा दंड | १० मार्च पासून होणार कार्यवाही.

PMC Good Governance Day | पुणे महानगरपालिकेतर्फे सुशासन सप्ताहानिमित्त परिसंवादाचे आयोजन

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – प्रत्येक वर्षी २५ डिसेंबर हा दिवस “सुशासन दिन” म्हणून साजरा केला जात असून केंद्र शासनामार्फत जिल्ह्यात सुशासन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. १९ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२४ या कालावधीत हा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने २३ डिसेंबर २०२४ रोजी पुणे महानगरपालिकेमध्ये (Pune Municipal Corporation – PMC) जुना जी. बी. हॉल मुख्य इमारत,तिसरा मजला या ठिकाणी परिसंवाद आणि प्रशिक्षणचे आयोजन करण्यात आले होते. (Pune Corporation News)

या परिसंवादाला आयुक्त राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य अनिल कवडे हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले होते. “सुशासन” या विषयावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी पुणे महानगरपालिकेच्या सह आयुक्त उल्का कळसकर, उप आयुक्त सामान्य प्रशासन प्रतिभा पाटील, उप आयुक्त संजय शिंदे, मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे, उप आयुक्त परिमंडळ क्रमांक ४ जयंत भोसेकर, उप आयुक्त परिमंडळ क्रमांक ३ आशा राऊत, उप आयुक्त परिमंडळ क्रमांक ५ डॉ. चेतना करूरे, माहिती व तंत्रज्ञान प्रमुख, राहुल जगताप आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप आयुक्त राजीव नंदकर यांनी केले.

 

यावेळी बोलतांना अनिल कवडे यांनी पुणे महानगरपालिकेच्या विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांना स्थानिक पातळीवरील प्रशासन आणि सार्वजनिक सेवा वितरण सुधारण्यासाठी सुप्रशासन कशा पद्धतीने करता येऊ शकते याविषयी मार्गदर्शन केले. प्रशासन म्हणजे सेवा, सुविधा आणि लाभ यांचे मिश्रण आहे. यामध्ये सुलभता, पारदर्शकता आणि विश्वासार्हतेचे महत्व त्यांनी उपस्थितांना पटवून दिले. या सर्व सुविधा शाश्वत असायला हव्यात आणि पुणे महानगरपालिकेने सतत नागरिकांच्या दृष्टीने विचार करून योग्य त्या सेवा आणि सुविधा पुरवल्या पाहिजेत. असे ते यावेळी म्हणाले.

पुढे बोलतांना ते म्हणाले, प्रशासनात काम करत असतांना लोकांमध्ये मानवी मूल्य, चांगले विचार रुजवण्याची जबाबदारीही आपलीच असते. नागरिकांना सेवा, सुविधा पुरवत असतांना योग्य त्या माध्यमाचा वापर व्हायला हवा यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजे. या सुविधा आणखी महानगरपालिकेच्या विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांना स्थानिक पातळीवरील प्रशासन आणि सार्वजनिक सेवा वितरण सुधारण्यासाठी सुप्रशासन कशा पद्धतीने करता येऊ शकते याविषयी मार्गदर्शन केले. प्रशासन म्हणजे सेवा, सुविधा आणि लाभ यांचे मिश्रण आहे. यामध्ये सुलभता, पारदर्शकता आणि विश्वासार्हतेचे महत्व त्यांनी उपस्थितांना पटवून दिले. या सर्व सुविधा शाश्वत असायला हव्यात आणि पुणे महानगरपालिकेने सतत नागरिकांच्या दृष्टीने विचार करून योग्य त्या सेवा आणि सुविधा पुरवल्या पाहिजेत. असे ते यावेळी म्हणाले. सुलभ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. तसेच शासकीय अधिकाऱ्यांनी आत्मचिंतन करून नागरिकाभिमुख विचार केले पाहिजे असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामान्य प्रशासन विभागाचे ऋषिकेश जगताप यांनी केले.