PMC GAD | महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रच सादर केले नाही | कारवाई करण्याचा सामान्य प्रशासन विभागाचा इशारा
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका आस्थापनेवर कार्यरत असलेल्या सर्व मागासवर्गीय (अजा, अज, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विमाप्र व इमाव) गटातून नेमणूक करण्यात आलेल्या सेवकांनी शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या शासकीय अधिनियम/परिपत्रकानुसार जातवैधता प्रमाणपत्र मुदतीत म्हणजे ६ महिन्याच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. मात्र विविध विभागातील ५८ सेवकांचे जात वैधता प्रमाणपत्र अद्याप सादर करण्यात आलेली नाहीत. या मध्ये आरोग्य विभाग, मिळकत कर विभाग, एलबीटी आणि विविध क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त यांनी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. (PMC General Administration Department)
उपायुक्त प्रतिभा पाटील यांच्या आदेशानुसार ज्या सेवकांची जात वैधता प्रमाणपत्र ७ दिवसांचे आत सामान्य प्रशासन विभागास सादर होणार नाही. त्यांच्या विरुद्ध शासन निर्णय व आज्ञापत्रकातील अटी व शर्ती नुसार पुढील प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. तसेच याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित सेवकाची राहील. संबंधित खातेप्रमुख/विभागप्रमुख यांनी या कार्यालय परिपत्रकाची समज त्यांचे नियंत्रणाखालील संबंधित सेवकांना द्यावी. असेही सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे.
COMMENTS