PMC Fire Brigade | अखेर अग्निशमन दलाकडून शिवणे येथे पाण्यात अडकलेल्या दोघांची सुखरुप सुटका!

अग्निशमन दलाकडून दोन व्यक्तींची सुटका

HomeBreaking News

PMC Fire Brigade | अखेर अग्निशमन दलाकडून शिवणे येथे पाण्यात अडकलेल्या दोघांची सुखरुप सुटका!

Ganesh Kumar Mule Aug 24, 2024 8:48 PM

Pune Fire News | सुसगाव येथे कामगारांच्या झोपड्यांना आग | ३ सिलेंडरचा स्फोट तर २८ सिलेंडर जळाल्याची घटना
PMC Fire Department | इमारतींना आणि आस्थापनांना फायर यंत्रणा नसेल तर …! पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचा नागरिकांना इशारा 
PMC Fire Department warns punekar… If buildings and establishments do not have a fire system…! 

PMC Fire Brigade | अखेर अग्निशमन दलाकडून शिवणे येथे पाण्यात अडकलेल्या दोघांची सुखरुप सुटका!

 

Pune Rain – (The Karbhari News Service) – आज  दुपारी 4 वाजणेच्या सुमारास शिवणे, दांगट पाटील इस्टेट कमान क्रमांक एक नजीक नदीपाञात दोन इसम अडकले असल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळाली. त्यानुसार दलाकडून नवले, वारजे, सिंहगड व पीएमआरडीए नांदेड सिटी येथून अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली होती. (Pune News)

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, नदीच्या पाञामध्ये अगदी मध्यभागी असणारया बेटावर दोन तरुण अडकले असल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने बचावकार्य करण्यास सुरवात करण्यात आली. नदीपाञाच्या दोन्ही बाजूने जवान मार्गस्थ होत होते. परंतु, पाण्याचा वाढता प्रवाह व किनारी खडकाळ भाग यामुळे आत जाताना अनेक अडथळे पार करीत बोट व रश्शी पाण्यात टाकत जवानांनी पुढे जात शेवटी त्या बेटापर्यंत पोहोचले. त्यानंतर ते दोघे अगदी घाबरलेल्या अवस्थेत असल्याने त्यांना धीर देत त्यांच्याशी संवाद साधत बोट व रश्शीचा वापर करीत सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांची सुखरुप सुटका केली. यावेळी खडकवासला धरणातून त्यावेळी होणारा विसर्ग काही वेळेकरिता कमी करण्यात आला होता.

या सर्व कामगिरीत अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे हे स्वत: घटनास्थळी अधिकारी व जवानांना मार्गदर्शन करीत होते. तसेच जलसंपदा विभाग, महापालिका आपत्ती कक्ष, पोलिस विभाग, स्थानिक नागरिक यांची या कामगिरीत मोलाची मदत झाली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0