PMC Fire Brigade | विबग्योर शाळेतील विद्यार्थ्यांना अग्निशमन दलाकडून प्रात्यक्षिके
Pune PMC News – (The Karbhari News Service) – अग्निशमन दलाकडे आग व आपत्कालीन परिस्थितीत काय करावे व काय करु नये याबाबत शहर परिसरात शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, हॉटेल, मॉल, मल्टिप्लेक्स, सरकारी आस्थापना व विविध निवासी आणि व्यावसायिक इमारतींमध्ये जनजागृतीपर विविध व्याख्याने तसेच प्रात्यक्षिक करुन दाखविले जातात. या अशा जनजागृतीपर कार्यामुळे प्राथमिक स्तरावर आग वा आपत्तीचा सामना कसा करावा याबाबत माहिती देण्यात येते आणि शहरातील नागरिक यामुळे जागरुक होतात व आग वा आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलास सहकार्य करत मदत करीत असतात. (Pune Municipal Corporation – PMC)

याप्रकारे आज सकाळी विगब्योर शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्र येथे अशाप्रकारे अग्निशमन विषयावर व्याख्यान व प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी अग्निशमन दलाचे जवान कशाप्रकारे आपले कर्तव्य बजावत असतात हे जाणून घेत अग्निरोधक उपकरण त्याचे प्रकार व वापर तसेच विविध क्षेत्रातील आगी, अपघात याबद्दल माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांकडून उस्फूर्तपणे नेहमीप्रमाणेच प्रतिसाद मिळाला आणि शिक्षकांनी अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे आणि जवानांचे आभार मानले.
——-
“अग्निशमन दल सातत्याने याप्रमाणे जनजागृतीपर विविध उपक्रम राबवित असते. नागरिकांकडून देखील याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळतो. प्रत्येकजण याबाबत जागरुक असावा जेणेकरून आपले शहर यापासून सुरक्षित राहण्यास मदतच होईल.”
– देवेंद्र पोटफोडे, अग्निशमन प्रमुख पुणे मनपा.

COMMENTS