PMC Encroachment Action – अतिक्रमण कारवाई विरोधात महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पथविक्रेते, फेरीवाले यांच्यावर अन्यायकारक अतिक्रमण कारवाई थांबवण्याच्या मागणीसाठी पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.आज, २९ नोव्हेंबर रोजी हे निवेदन देण्यात आले. (Pune Municipal Corporation – PMC)
यावेळी अध्यक्ष संजय आल्हाट,सरचिटणीस रणजीत सोनावळे, संपर्कप्रमुख राहुल उभे, श्रीनाथ आढागळे, शहराध्यक्ष कल्पनाताई जावळे, उपाध्यक्ष लक्ष्मीताई जाधव उपस्थित होते.
| बायोमेट्रीक सर्वेक्षणाची मागणी
पथविक्रेत्यां साठी शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी बायोमेट्रीक सर्वेक्षणाची गरज आहे.२०१४ नंतर सर्वेक्षण झालेले नाही. मात्र, अतिक्रमण विरोधी कारवाई सुरु आहे.यासंबंधी पालिकेकडे, राज्यशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे. सर्वेक्षण होण्या आधीच अतिक्रमण विरोधी कारवाई केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
COMMENTS