PMC Encroachment Action | आंबेगाव बु मध्ये सिंहगड कॉलेज जवळील 11  अनधिकृत इमारतीवर महापालिकेकडून कारवाई!

HomeपुणेBreaking News

PMC Encroachment Action | आंबेगाव बु मध्ये सिंहगड कॉलेज जवळील 11 अनधिकृत इमारतीवर महापालिकेकडून कारवाई!

कारभारी वृत्तसेवा Dec 29, 2023 1:11 PM

Holidays List in New Year 2024 | PMC | नवीन वर्षात फक्त २० सुट्ट्या | शनिवार रविवार मध्ये ७ सुट्ट्या जाणार 
M J Pradip Chandren IAS | पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी एम जे प्रदीप चंद्रन! | राज्य सरकार कडून आदेश जारी
Deepali Dhumal | 40% सवलत दिल्याबद्दल आभार, पण तीनपट टॅक्स आकारणी एकपट करण्याचे आश्वासन हवेत | दिपाली धुमाळ 

PMC Encroachment Action | आंबेगाव बु मध्ये सिंहगड कॉलेज जवळील 11  अनधिकृत इमारतीवर महापालिकेकडून कारवाई!

| 45 हजार चौरस फूट बांधकाम पाडले

PMC Encroachment Action | पुणे पेठ आंबेगाव बु. या भागातील (Ambegaon Budruk Pune)  सिंहगड कॉलेजलगतच्या (Sinhagad College) स.नं. १० पैकी मधील एकुण ११ अनधिकृत इमारतींवर महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग, झोन क्र.२ यांचे मार्फत काल परिणाम कारक कारवाई करण्यात आली. या भागातील सिंहगड कॉलेजलगतच्या एकुण ११ अनधिकृत इमारतींवर सुमारे ४५०५० चौ. फुटाचे अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई केली. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (PMC Building Devlopment Department)
 सदर कारवाई मध्ये बांधकाम विकास विभाग, झोन क्र.२ कडील कार्यकारी अभियंता, उप अभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, पुणे महानगरपालिकेचे
अतिक्रमण विभागाकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेसह पोलीस पोलीस कर्मचारी तसेच स्थानिक पोलीस बंदोबस्त व पुणे मनपाचे ७ बिगारी, १ जॉ क्रशर मशिन, ३ जेसीबी, २ ब्रेकर, १गॅस कटर यांच्या सहाय्याने कारवाई करणेत आली. (Pune Municipal Corporation)

कारवाई मध्ये सुमारे ११ इमारतींचे एकुण ४५०५० चौ. फुटाचे पाडकाम करण्यात आले. सदर भागामध्ये वारंवार मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात येत असल्याने या पुढील काळात सुध्दा प्रशासना तर्फे मोठ्या प्रमाणावर व परिणामकारक कारवाई करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. नागरिकांनी सदनिका विकत घेताना इमारतीस पुणे मनपाची बांधकाम परवानगी तसेच महारेरा कडे नोंदणी केल्या बाबतची खातरजमा करणेत यावी असे आवाहन पुणे महानगरपालिके तर्फे करण्यात आले आहे.