PMC Employees Union | पीएमसी एम्प्लॉईज युनियनने  उत्साहात साजरा केला 66 वा वर्धापन दिन 

Homeadministrative

PMC Employees Union | पीएमसी एम्प्लॉईज युनियनने  उत्साहात साजरा केला 66 वा वर्धापन दिन 

Ganesh Kumar Mule Oct 24, 2024 9:25 PM

NPS | PMC Pune | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा (NPS)  मिळणार लाभ!
PMC CHS Card | एका CHS कार्डवर कर्मचारी किंवा सभासदांना आई-वडील किंवा सासू-सासरे यांनाच लाभ घेता येणार | एकाचवेळी चौघांना लाभ न देण्याचा CHS कमिटीचा निर्णय
Tender rights | PMC Pune | निविदा अधिकार सुपुर्तीबाबत महापालिका आयुक्तांचे महत्वपूर्ण आदेश | उपअभियंत्यांना १ लाखापर्यंत, कार्यकारी अभियंत्यांना १ लाख ते १० लाखापर्यंत निविदा काढण्याचे अधिकार

PMC Employees Union | पीएमसी एम्प्लॉईज युनियनने  उत्साहात साजरा केला 66 वा वर्धापन दिन

 

 PMC Emplyees Union – (The Karbhari News Servcie) – पीएमसी एम्प्लॉईज युनियनने मोठ्या उत्साहात 66 वा वर्धापन दिन साजरा केला. कॉ. आप्पासाहेब भोसले यांनी 24 ऑक्टोबर 1965 रोजी पीएमसी एम्प्लॉईज युनियनची स्थापना केली होती. (Pune Municipal Corporation – PMC)

 

मान्यताप्राप्त युनियनचे अध्यक्ष कॉ. उदय भट  यांच्या हस्ते का दीप प्रज्वलन करून आप्पासाहेब भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी पीएमसी युनियन चे अध्यक्ष बजरंग पोखरकर, जनरल सेक्रेटरी श्रीधर चव्हाण, तसेच कार्याध्यक्ष पूजा देशमुख यांनी सर्व सहकाऱ्यांचे स्वागत केले. याप्रसंगी भट सरांनी पीएमसी एम्प्लॉईज युनियन ला लाभलेला इतिहास हा सर्वांना सांगितला. मान्यता प्राप्त यूनियन आणि पीएमसी युनियन हा सर्व कर्मचाऱ्यांचा आत्मा आहे सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे वचन कॉ.अप्पासाहेब भोसलेंच्या प्रतिमेसमोर केले. पेढे वाटून सर्वांनी हा वर्धापन दिन साजरा केला. (Pune PMC News)

त्यानंतर सर्वच पदाधिकारी व सदस्य यांनी मिळून मनपा भवन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन केले. मनपा मुख्य भवन येथील मेन पोर्च मध्ये रांगोळीच्या माध्यमातून सर्व सेवकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

पीएमसी एमप्लॉईज युनियनच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त व दिवाळीनिमित्त पुणे महानगरपालिका शाळा क्रमांक 14 येथील दिव्यांग मुले व मुली तसेच पुणे महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेले तृतीयपंथी यांना मुख्य भवन येथे हिरवाळीवर दिवाळी फराळाचे वाटप पार पडला. सर्व दिव्यांग मुलांना व तृतीयपंथी सुरक्षारक्षकांना  अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी, उपयुक्त कर आकारणी व कर संकलन  माधव जगताप,  उपायुक्त समाज विकास विभाग नितीन उदास  ,माननीय उपायुक्त पठाण , किशोरी शिंदे , सोमनाथ बनकर उपायुक्त पुणे महानगरपालिका यांच्या हस्ते दिव्यांग मुले मुली व सुरक्षारक्षक यांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

——

पीएमसी एम्प्लॉईज युनियन मार्फत हा आगळा वेगळा उपक्रम राबवला जातो. यात आम्हाला सहभागी करून घेतलं त्या बद्दल अध्यक्ष आणि पदाधिकारी यांचे आभार मानतो तुमच्या हातून अशीच समाजहिताची कामे आणि सेवकांची सेवा घडो व तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…

पृथ्वीराज बी पी, अतिरिक्त आयुक्त. 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0