PMC Employees Transfer | प्रशासकीय आणि अभियांत्रिकी संवर्गातील ४०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनानुसार होणार बदल्या!
| एकाच खात्यात ३ वर्षाहून अधिक कालावधी पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेतील एकाच खात्यात ३ वर्षाहून अधिक कालावधी पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नियतकालिक बदल्या करण्यात येणार आहेत. प्रशासकीय आणि अभियांत्रिकी संवर्गातील असे एकूण ४१९ कर्मचारी आहेत. यांच्या बदल्या करण्यास महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार समुपदेशन करून या बदल्या केल्या जाणार आहेत. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC)
१८ आणि १९ जून रोजी समुपदेशन चालणार आहे. त्यानुसार प्रशासनाने वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार १८ जून ला कार्यकारी अभियंता (स्थापत्य) सकाळी ११ वाजता, उप अभियंता (स्थापत्य) ११:२० वाजता, उप अभियंता (विद्युत) दुपारी १ वाजता आणि वरिष्ठ लिपिक यांनी दुपारी ३ वाजता बदलीच्या कार्यवाहीसाठी उपस्थित रहायचे आहे. तर १९ जून ला लिपिक टंकलेखक यांनी सकाळी १०:३० ला उपस्थित रहायचे आहे.
| बदलीपात्र असलेले कर्मचारी
१- कार्यकारी अभियंता (स्थापत्य) : ८
२- उप अभियंता (स्थापत्य) : ३७
३- उप अभियंता (विद्युत) : ४
४- वरिष्ठ लिपिक : ७६
५- लिपिक टंकलेखक : २९४
—
दरम्यान समुपदेशन नुसार गेल्या दोन वर्षापासून बदल्या केल्या जात आहेत. परंतु त्यामध्ये शेवटी राहणाऱ्या सेवकांवर अन्याय होतो. त्यांना कुठल्याच खात्यांचा चॉईस राहत नाही. त्यामुळे तक्रारी वाढतात. या बदल्या करत असताना सर्व खाती एकदम ओपन न करता टप्प्याटप्प्याने ओपन करण्यात याव्यात, जेणेकरून शेवटच्या सेवकापर्यंत सर्व खाती शिल्लक राहतील. अशी मागणी पी एम सी एम्प्लॉईज युनियन संघटनेच्या वतीने सामान्य प्रशासन विभागाकडे केली आहे.
—-
COMMENTS