PMC Employees Promotion | गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेली नगरसचिव विभागातील विविध पदांची पदोन्नती प्रक्रिया मार्गी!  | अतिरिक्त आयुक्तांची सकारात्मक भूमिका | महापालिका आयुक्त यांनी केले कर्मचाऱ्यांचे अभिनंदन 

Homeadministrative

PMC Employees Promotion | गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेली नगरसचिव विभागातील विविध पदांची पदोन्नती प्रक्रिया मार्गी! | अतिरिक्त आयुक्तांची सकारात्मक भूमिका | महापालिका आयुक्त यांनी केले कर्मचाऱ्यांचे अभिनंदन 

Ganesh Kumar Mule Dec 06, 2025 2:10 PM

Pune  Mhada | डिजीटल स्वाक्षरीची शहानिशा करुनच सदनिकेचा विक्री करारनामा करण्याचे पुणे म्हाडाचे आवाहन
PMC Pune Tender | RTO टेंडर बाबतची तक्रार निराधार | महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार यांचा खुलासा
Pune Congress | पुणे स्टेशन येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ पुणे काँग्रेसच्या वतीने आंदोलन

PMC Employees Promotion | गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेली नगरसचिव विभागातील विविध पदांची पदोन्नती प्रक्रिया मार्गी!

| अतिरिक्त आयुक्तांची सकारात्मक भूमिका | महापालिका आयुक्त यांनी केले कर्मचाऱ्यांचे अभिनंदन

 

PMC Municipal Secretary Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका नगरसचिव विभागातील विविध पदांची पदोन्नती प्रक्रिया गेल्या ५ ते वर्षापासून रखडली होती. यात ज्येष्ठ समिती लेखनिक, समिती लेखनिक, जमादार, शिपाई अशा पदांचा समावेश आहे. विविध कारणांनी पदोन्नती समितीची बैठक पुढे ढकलली जात होती. अखेर शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पदोन्नती प्रक्रिया मार्गी लागली आहे. (Pune Municipal Corporation- PMC)

अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांची सकारात्मक भुमिका यात महत्वाची ठरली आहे. तसेच आयुक्त नवल किशोर राम यांनी देखील या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. आता लवकरच कर्मचाऱ्यांना ऑर्डर दिल्या जातील.

समिती लेखनिक पदावरून ज्येष्ठ समिती लेखनिक पदावर तीन कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचे पे मॅट्रिक्स एस १० वरून एस १२ असे झाले आहे.

– ज्येष्ठ समिती लेखनिक पदावर पदोन्नती मिळालेले हे आहेत कर्मचारी

१.  राजेश वाघमोडे

२. शशिकांत जंगले

३. संजय घरत

लिपिक टंकलेखक पदावरून समिती लेखनिक या पदावर मिळालेले ५ कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांचे पे मॅट्रिक्स आता एस १० असे झाले आहे.

हे आहेत कर्मचारी

१. स्नेहा पवार

२. गौरव फाटक

३. रोहित भालेकर

४. चेतावनी माने – पाटील

५. पुष्पा टेमकर

शिपाई पदावरून जमादार/हवालदार/नाईक पदावर पदोन्नती मिळालेले ३ कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांचे वेतनश्रेणी अर्थात पे मॅट्रिक्स एस १ वरून एस ६ असे झाले आहे.

हे आहेत कर्मचारी

१. प्रकाश धामूनसे

२. विशाल भोकरे

३. सिद्धार्थ कांबळे

बिगारी पदावरून शिपाई या पदावर पदोन्नती मिळालेला एक कर्मचारी आहे. पदोन्नती मिळाली असली तरी पे मॅट्रिक्स हे एस १ वरून एस  १ असेच राहणार आहे.

शिपाई पदावर पदोन्नती मिळालेला कर्मचारी

१. रितेश जाधव

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: