PMC Employees promotion | पुणे महापालिकेच्या ८ प्रशासन अधिकारी यांना सहायक आयुक्त या पदावर पदोन्नती!
| महापालिका आयुक्त यांच्याकडून आदेश जारी
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका प्रशासनकडील ८ प्रशासन अधिकारी (वर्ग २) या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहायक आयुक्त (वर्ग १ – S-20) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना विविध क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार देखील देण्यात आला आहे. महापालिका आयुक्त नेवल किशोर राम यांनी नुकतेच याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)
सेवाज्येष्ठतेनुसार ही पदोन्नती प्रक्रिया करण्यात आली आहे. या पदोन्नती ने लेखनिकी संवर्गातील कर्मचारी मात्र चांगले खुश झाले आहेत.
– हे प्रशासन अधिकारी झाले सहायक आयुक्त
१. दिपक राऊत – कर आकारणी आणि कर संकलन विभाग-( अतिरिक्त पदभार- वारजे – कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय)
२. गोविंद दांगट – क्रीडा विभाग
३. अस्लम पटेल – स्थानिक संस्था कर कार्यालय
४. जगले तिमय्या – शिवाजीनगर घोले रॉड क्षेत्रीय कार्यालय
५. सदानंद शिंपी – ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालय
६. प्रकाश बालगुडे – कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय
७. अशोक भवारी – येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालय
८. नलिनी सूर्यवंशी- बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय
—-
– प्रमोद उंडे यांना पदोन्नती
दरम्यान विद्युत विभागात कार्यकारी अभियंता पदावर काम करणाऱ्या प्रमोद उंडे यांना अधीक्षक अभियंता (S-25) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. सेवाज्येष्ठेतनुसार ही पदोन्नती देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. —-

COMMENTS