PMC Employees Promotion | वर्षभरात महापालिकेच्या ६०० कर्मचाऱ्यांना पदोन्नती | आयुक्तांच्या हस्ते दिल्या ऑर्डर, आज्ञापत्र
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत नुकतेच विविध विभागांमधील पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती आदेश तसेच अनुकंपा तत्त्वावर व लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार पात्र वारसांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. या प्रसंगी आयुक्त नवल किशोर राम, महापालिका अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांच्या हस्ते मुद्रणालय, नगरसचिव विभाग व अभियंता यांच्या विविध संवर्गातील पदोन्नतीचे आदेश व काही वारसांना नियुक्तीचे आज्ञापत्र देण्यात आले. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आली. (PMC General Administration Department)
या कार्यक्रमात महापालिका आयुक्त यांनी सन २०२५ – २६ मध्ये झालेल्या एकूण पदोन्नतींचा सविस्तर आढावा उपस्थितांसमोर ठेवला. त्यामध्ये –
एकूण पदोन्नती अधिकारी/कर्मचारी संख्या : ६००
वर्ग १ – २९
वर्ग २ – १५६
वर्ग ३ – ४१५
तसेच, महापालिका आयुक्त यांनी सन २०२५ – २६ मध्ये अनुकंपा तत्त्वावर व लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आलेल्या वारस नियुक्ती बाबतही माहिती दिली.
लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार वारस नियुक्ती संख्या- ५६२
अनुकंपा तत्त्वानुसार वारस नियुक्ती संख्या- ७०
या प्रसंगी महापालिका आयुक्त यांनी पदोन्नती प्रक्रिया आणि अनुकंपा नियुक्त्या पारदर्शक, नियमबद्ध आणि वेळेवर करण्यासाठी विभाग कटिबद्ध असल्याचे सांगितले. कर्मचाऱ्यांच्या कार्याचा योग्य सन्मान करणे आणि प्रशासनिक कार्यक्षमता वाढविणे याबाबत विभागाची वचनबद्धता त्यांनी व्यक्त केली. सर्व पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी अधिक उत्साहाने योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
——-
कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना अनुकंपा तत्त्वावर व लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार नोकरी प्राप्त झाल्यामुळे वारसांच्या कुटुंबियांना आर्थिक हातभार लागण्यास मदत झाली आहे आणि काही पदांना प्रदीर्घ कालावधी नंतर पदोन्नती मिळाल्यामुळे अधिकारी/कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
| विजयकुमार थोरात, उपायुक्त.

COMMENTS