PMC Election | आगामी महानगरपालिकेच्या तयारी संदर्भात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची कोर कमिटीची बैठक संपन्न

HomeBreaking News

PMC Election | आगामी महानगरपालिकेच्या तयारी संदर्भात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची कोर कमिटीची बैठक संपन्न

Ganesh Kumar Mule May 23, 2025 9:16 PM

Chandani Chauk | ओव्हरपास तोडताना काही नुकसान, असुविधा झाल्यास NHAI जबाबदार राहणार नाही चांदणी चौक फ्लायओव्हर कामाच्या संदर्भात NHAI चे जाहीर आवाहन
Vedanta Foxconn project | महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्यासाठीच वेदांता गुजरातला हलविला  |खासदार सुप्रिया सुळे | राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार आंदोलन
Cheque bounce rule | जर तुम्ही चेकद्वारे पैसे देत असाल तर लक्ष द्या | एक छोटीशी चूक खूप नुकसान करू शकते

PMC Election | आगामी महानगरपालिकेच्या तयारी संदर्भात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची कोर कमिटीची बैठक संपन्न

 

NCP -SCP Pune – (The Karbhari News Service) – आगामी पुणे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची कोर कमिटी बैठक राष्ट्रवादी काँग्रेस भवन पुणे येथे संपन्न झाली. (Pune Nes)

आगामी महानगरपालिका निवडणुकी संदर्भात प्रामुख्याने आघाडी बाबत शहरातील सद्यपरिस्थितीचा आढावा घेत सकारात्मक चर्चा झाली, प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या प्रभाग रचनेसंदर्भात निर्माण होणाऱ्या संभाव्य तक्रारींबाबत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे, पालिकेत यापूर्वी सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पार्टीने नियोजनबद्ध विकास न करता शहरात केलेल्या चुकीच्या कामामुळे आज शहराची झालेली वाताहत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पावसाळ्यात शहरातील अनेक भागांमध्ये शासनाचे पाणी यातून होणारे नुकसान पर्यावरणासंदर्भात हाती घेण्यात आलेले चुकीचे प्रकल्प या सर्व चुकीच्या कामांची माहिती सर्वसामान्य पुणेकरांपर्यंत पक्ष पोहोचवणार आहे तसेच पक्षाची शहरातील संघटनात्मक बांधणी मजबूत असून पक्षाच्या सर्व सेलला निवडणुकीसाठी तयार ठेवण्याचे देखील या बैठकीत ठरविण्यात आले आहे.

यांसह वेगवेगळ्या विषयांवर या कोअर कमिटीच्या बैठकीदरम्यान चर्चा झाली.

या बैठकीसाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेत्या माजी खासदार वंदनाताई चव्हाण, माजी आमदार जगन्नाथबापू शेवाळे, माजी आमदार जयदेवजी गायकवाड, आमदार श्री.बापूसाहेब पठारे, माजी आमदार कमलनानी ढोले पाटील, ज्येष्ठ नेते अंकुशअण्णा काकडे, रवींद्रअण्णा माळवदकर, विशाल तांबे ,अश्विनीताई कदम, श्रीकांत पाटील ,सचिन दोडके ,भगवानराव साळुंखे ,डॉ.सुनील जगताप, पंडित कांबळे ,प्रकाश आप्पा म्हस्के आदी नेते तथा पदाधिकारी उपस्थित होते.