PMC Election Nomination Form | दोन दिवसात ६४३७ नामनिर्देशन फॉर्मची विक्री!
PMC Election 2025-26 – (The Karbhari News Service) – राज्य निवडणूक आयोगच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सन २०२५-२६ कार्यक्रम जाहीर झाला आहे. याकरिता ४१ प्रभागातून १६५ सदस्य निवडणुकीसाठी १५ निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत. १५ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांकडून काल रोजी पर्यंत एकूण २८८६ नामनिर्देशन फॉर्मची विक्री करण्यात आलेली होती. तर आज रोजी एकूण ३५५१ नामनिर्देशन फॉर्मची विक्री करण्यात आली आहे. असे दोन दिवसात एकूण ६४३७ नामनिर्देशन फॉर्मची विक्री करण्यात आली आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC)
नामनिर्देशन फॉर्मची आज रोजी सर्वात जास्त विक्री निवडणूक निर्णय अधिकारी, हडपसर मुंढवा कार्यालय, पुणे महानगरपालिका यांचे कार्यालयाकडून करण्यात आलेली आहे. तथापि सर्वात कमी विक्री निवडणूक निर्णय अधिकारी, कोंढवा येवलेवाडी कार्यालय, पुणे महानगरपालिका यांचे कार्यालयाकडून करण्यात आलेली आहे.
येरवडा कळस धानोरी कार्यालय – ४००
नगर रोड -वडगाव शेरी कार्यालय – ३८१
कोथरूड बावधन कार्यालय – २७२
औंध बाणेर कार्यालय – १६८
शिवाजीनगर घोले रोड कार्यालय – २०६
कै बा स ढोले पाटील रोड कार्यालय – २१६
हडपसर मुंढवा कार्यालय – ४२९
वानवडी रामटेकडी कार्यालय – १९२
बिबवेवाडी कार्यालय – २००
भवानी पेठ कार्यालय – २५८
कसबा विश्रामबाग वाडा कार्यालय – १२४
वारजे कर्वेनगर कार्यालय – १७२
सिंहगड रोड कार्यालय – २१३
धनकवडी सहकारनगर कार्यालय – २३२
कोंढवा येवलेवाडी कार्यालय – ८८
या सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमधून आज रोजी या प्रमाणे विक्री करण्यात आलेली असून आज निवडणूक निर्णय अधिकारी, सिंहगड रोड कार्यालय अंतर्गत एका उमेदवाराकडून तीन नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आलेली आहोत.
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सन २०२५-२६ अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी करणेसाठी पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये विविध आचारसंहिता पथके कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. जेणेकरून निवडणूक प्रक्रिया मुक्त, पारदर्शी आणि निर्भयपणे पार पाडण्यास मदत होणार आहे. असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

COMMENTS