PMC Election 2025 | महापालिका निवडणूक मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेसाठी आवश्यक मनुष्यबळ व्यवस्थापन कक्षासाठी महापालिका तयार करणार संगणक प्रणाली 

Homeadministrative

PMC Election 2025 | महापालिका निवडणूक मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेसाठी आवश्यक मनुष्यबळ व्यवस्थापन कक्षासाठी महापालिका तयार करणार संगणक प्रणाली 

Ganesh Kumar Mule Nov 12, 2025 8:26 PM

PMC Ward 2 – Phulenagar – Nagpur Chawl | प्रभाग क्रमांक २ – फुलेनगर- नागपूर चाळ | कशी आहे या प्रभागाची व्याप्ती! जाणून घ्या कुठपर्यंत आहे हद्द!
PMC Ward 1 – Kalas – Dhanori | प्रभाग क्रमांक १ – कळस – धानोरी | प्रभागाची व्याप्ती, लोकसंख्या असे सर्व काही जाणून घ्या 
PMC Election 2025 | सरकारच्या अधिसूचनेनुसार पुणे महानगरपालिकेने पुन्हा एकदा आरक्षण काढावे | माजी नगरसेवकांची महापालिका आयुक्तांकडे  मागणी 

PMC Election 2025 | महापालिका निवडणूक मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेसाठी आवश्यक मनुष्यबळ व्यवस्थापन कक्षासाठी महापालिका तयार करणार संगणक प्रणाली

 

PMC Election Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक २०२५ च्या मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी   आवश्यक मनुष्यबळ व्यवस्थापन कक्षासाठी लागणारी संगणक प्रणाली महापालिका तयार करणार आहे.  तातडीची बाब म्हणून खाजगी संस्थेमार्फत म्हणजे Priyatech Solution (Pune) Pvt Ltd  महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील अनुसूची “ड” मधील प्रकरण ५ मधील २ (२) नुसार हे काम करून घेतले जाणार आहे. त्यासाठी ९ लाख ७७ हजार इतका खर्च होणार आहे. या बाबतचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation Election 2025 )

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ निवडणूक साठी निवडणूक प्रक्रिया राबविणेकरीता निवडणूक कामकाजाची प्रक्रिया सुरु झाली असून प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे.

पुणे शहरातील सुमारे तीन हजार आस्थापनांमधून अंदाजे ३०,००० अधिकारी / कर्मचारी यांची online स्वरुपात माहिती मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी उपलब्ध करून घ्यावयाची आहे व प्राप्त माहितीच्या आधारे मतदान केंद्रावरील अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करणेकामी अनुषंगिक कामे करायची आहेत. यामध्ये विविध  कामांचा समावेश आहे. यामध्ये पहिले व दुसरे प्रशिक्षण आदेश, मतदान व मतदान मोजणी केंद्रावरील नियुक्ती आदेश, प्रशिक्षण सत्रनिहाय हजेरी, अनुपस्थितीबाबत मेमो, मतदान केंद्रनिहाय ५ कर्मचारी यांच्या टीमचे अंतिम नियुक्ती आदेश, मतदान व मतमोजणी केंद्रनिहाय रुजू हजेरी, झोनल अधिकारी यांचे नियुक्ती आदेश व हजेरी, मतदान केंद्र निहाय मुशाहिरा वाटप तक्ता व इतर अनुषंगिक कामे करणे याचा समावेश आहे.

निविदा प्रक्रिया राबवून, कार्यादेश देऊन काम सुरु होण्यास मोठा विलंब होणार असून विहित मुदतीत मनुष्यबळ व्यवस्थापन कक्षाचे कामकाज पूर्ण होणार नाही व त्याचा ताण या कार्यालयावर येऊन निवडणुक प्रक्रीयेत मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत. हे काम तातडीचे असल्याने निविदा न मागवता महापालिका आयुक्त यांना असलेल्या अधिकारात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ५.२.२ नुसार करून करून घेण्यात येणार आहे.

मनुष्यबळ व्यवस्थापन कक्षासाठी आवश्यक असणाऱ्या online संगणक प्रणालीबाबत काही खाजगी संस्थांशी चर्चा असून ” त्यांनी ९ ते १० लक्ष जी एस टी सहित एवढ्या खर्चाचा अंदाज दिला. हे काम निवडणूक विभागाच्या  आवश्यकतेनुसार करून घेण्यात येणार असून संपूर्ण मतदान व मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सदर खाजगी संस्था सपोर्ट करणार आहेत. या कामी माहिती तंत्रज्ञान विभागाकडून सदर online संगणक प्रणाली पुणे महानगरपालिकेच्या सर्व्हरवर स्थापित करणेसाठी electionhr.punecorporation.org हे डोमेन नेम व सर्व्हर उपलब्ध करून घेण्यात येत असल्याने माहितीची सुरक्षितता व संपूर्ण संगणक प्रणाली पुणे महानगरपालिकेच्या मालकीची राहणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: