PMC Devlopment Work Bill | बिले सादर करण्याबाबत पुन्हा ठरवावी लागली नियमावली | काम सुरु केल्याच्या दिनांकापासून प्रत्येक तिमाहीच्या अखेरीस बिले सादर करण्याचे आदेश
| महापालिका आयुक्तांनी ठरवून दिली नियमावली
Naval Kishore Ram IAS – (The Karbhari News Service) – महापालिकेचा वेतनविषयक खर्च वगळता उर्वरित बाबींवर होणारा खर्च आर्थिक वर्षाचे कालावधीत समप्रमाणात होत नसल्याने बहुतांश तरतुदी वर्षभर अखर्चित राहतात. आर्थिक वर्षाचे अखेरच्या कालावधीत सदर तरतूद मोठ्या प्रमाणावर खर्ची होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या सर्व बाबींवर नियंत्रण आणणे करिता नियमावली ठरवून देण्यात आली होती. मात्र तथापि, या प्रमाणे कार्यवाही होत असल्याचे निदर्शनास येत नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नवीन नियमावली ठरवून दिली आहे. (Pune PMC News)
पुणे महानगरपालिकेकडील विविध विकास कामे, देखभाल दुरुस्ती कामे, खरेदी, कंत्राटी कामगार, विविध सल्लागार इ.संदर्भात बाह्यस्त्रोताद्वारे / कंत्राटी पद्धतीने कामे करून घेण्यात येतात. या प्रकारे करून घेण्यात आलेल्या कामांची देयके विहित मुदतीत सादर केल्यास कामांना होणाऱ्या अनावश्यक विलंबास आळा घालणे शक्य होते.
वित्तीय समितीने मान्यता दिल्यानंतर तातडीने पूर्वगणनपत्रके तयार करून निविदा प्रक्रिया लवकरात लवकर राबवून कार्यादेश दिल्यानंतर प्रथम सहामाहीमध्ये होणारा खर्च व प्रतिमहा अपेक्षित खर्च खात्यांनी CASH FLOW STATEMENT मध्ये सादर करणे आवश्यक आहे तसेच तिमाही संपल्यानंतर तिमाहीमधील झालेला खर्च / उत्पन्न याबाबत संबंधित विभागांनी अतिरिक्त महापालिका आयुक्त यांचेमार्फत महापालिका आयुक्त यांना अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे हि नियमावली ठरवली आहे.
१. कार्यादेशाच्या दिनांकापासून / काम सुरु केल्याच्या दिनांकापासून प्रत्येक तिमाहीच्या अखेरीस पूर्ण झालेल्या कामांची देयके आदा करणेकरिता मुख्य लेखा व वित्त विभागाकडे सादर करावीत.
एप्रिल ते जून मध्ये झालेल्या कामांची देयके – जुलै मध्ये अदा करणे.
जुलै ते सप्टेंबर मध्ये झालेल्या कामांची देयके – ऑक्टोबर मध्ये अदा करणे
ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये झालेल्या कामांची देयके – जानेवारी मध्ये अदा करणे
जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये झालेल्या कामांची देयके – फेब्रुवारी अखेर अदा करणे.
. . माहे मार्च व आर्थिक वर्षातील उर्वरित सर्व देयके १५ मार्च अखेर अदा करणे आवश्यक आहे. याबाबतची दक्षता खात्याने घ्यावी जेणेकरून वित्तीय शिस्तीचे पालन होईल व तरतूद व्यपगत होणार नाही. असे आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
२. खरेदी संबंधी निविदा १५ मार्चच्या नंतर मागवू नये जेणेकरून माल प्रत्यक्ष प्राप्त होऊन त्याची तपासणी करून बिले अदा करणे शक्य होईल. यामुळे महानगरपालिकेचे दरवर्षीचे ताळेबंद वेळेत तयार करणे शक्य होईल व पुढील आर्थिक वर्षामध्ये अनावश्यक आर्थिक बोजा पुणे महापालिकेवर येणार नाही.
३. काम पूर्ण झालेल्या दिनांकापासून १२ महिन्यापेक्षा अधिक कालावधीत सदर देयक आदा केले नसल्यास अथवा सदर देयके पुढील आर्थिक वर्षात सादर केल्यास अतिरिक्त महापालिका आयुक्त यांची पुर्वमान्यता घेऊन देयक मुख्य लेखा व वित्त विभागाकडे सादर करावीत.
४. काम सुरु असलेल्या कालावधीतील संबंधित कर्मचारी / खातेप्रमुख यांची काम पूर्ण होण्यापूर्वी अथवा देयक आदा करणेपूर्वी संबंधित विभागातून बदली झाल्यामुळे देयके प्रलंबित होऊ नयेत. यासाठी त्यांचे जागी रुजू झालेल्या संबंधित कर्मचारी / खातेप्रमुख यांनी सदर कामाची पडताळणी करून देयकावर स्वाक्षरी करावी.
५. बाह्यस्त्रोतामार्फत निविदेद्वारे सेवा घेण्यात येणाऱ्या कंत्राटी कामगारांची देयके आदा करणेबाबत आदेशाप्रमाणे कार्यवाही करावी.
६ . कंत्राटी कामे करणाऱ्या सर्व ठेकेदारांनी TAX INVOICE सादर करणेबाबत यापूर्वी मुख्य लेखा व वित्त विभागाने सर्व विभागांना निर्देशित करण्यात आले असून त्याप्रमाणे कार्यवाही करावी

COMMENTS